Ultra Zakas ott esakal
Premier

ऑगस्टमध्ये अल्ट्रा झकास ओटीटीवर थ्रिलर चित्रपटांची मेजवानी; 'झकास फ्रायडेस' मध्ये पाहा हॉलिवूड -टॉलिवूडचे भयपट

Payal Naik

Movies Releasing On Ott In August: ऑगस्ट महिन्यात, अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर थ्रिल आणि ॲक्शनचे चित्रपट येत आहेत, जे तुम्ही तुमच्या मित्र परिवार आणि कुटुंबासोबत पाहू शकता. साऊथचा समारा पासून ते हॉलीवुडचा लाय बाओ पर्यंत, प्रत्येक शुक्रवारी नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर पाहूया ऑगस्टमध्ये कोणते पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

samara

समारा (नराधम)

‘समारा’ मल्याळम चित्रपट लवकरच मराठीत (नराधम) ०२ ऑगस्ट २०२४ रोजी अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक चार्ल्स जोसेफ आहे. ही कथा अँथनी नावाच्या पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते, जो एका बर्फाळ भागात रहस्यमय विषाणूचा प्रादुर्भाव तपासत आहे.

daak

डाक

‘डाक’ हा एक भयपट आणि सस्पेन्स थ्रिलर आहे ज्याचे दिग्दर्शन आणि लेखक महेश नेने यांनी केले आहे. चित्रपटात अश्विनी काळसेकर, अनिकेत केळकर आणि संजीवनी जाधव यांच्या अप्रतिम भूमिका आहेत. हा चित्रपट ०९ ऑगस्ट २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. गावात राहणारा गोपाळ आत्महत्या करतो. गोपाळच्या मृत्यू संदर्भात तपास सुरू करण्यासाठी गावात काही अधिकारी पोहोचतात. गोपाळने खरंच आत्महत्या केली कि त्याची आत्महत्या घडवून आणली?

flesh wounds

Flesh Wound’s (जखम)

हॉलीवूडचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘फ्लेश वूंड’ म्हणजेच (जखम) १६ ऑगस्ट २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर मराठीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅन गार्सिया असून चित्रपटाची कथा एलिट ऑप्स टीम एल.टी. टायलरच्या नेतृत्वाखाली आहे. एल.टी. टायलर आणि त्यांच्या टीमला चोवीस तासांच्या आत बेपत्ता झालेल्या शास्त्रज्ञांच्या गटाचा तपास करण्याचा आदेश दिला आहे जे टॉप-सिक्रेट मिशनवर काम करत असतात.

chase

Chase ( शर्यत)

आता प्रेक्षकांना कन्नडचा 'चेज' (क्रूर शर्यत) या चित्रपटाचा आनंद मराठीत घेता येईल जो २३ ऑगस्ट २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेत्रहीन माजी पोलीस अधिकारी निधीला एका अनोळखी माणसाची मदत घेऊन घरी जात असताना एका अनपेक्षित अपघाताचा अनुभव होतो. जेव्हा ती पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी जाते तेव्हा सीसीबी अधिकारी अविनाश या प्रकरणाची जबाबदारी घेतात. ही केस निधी आणि अधिकारी, दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारे अनपेक्षित वळण घेऊन येते.

lai bao

लाय बाओ (शक्तिशाली)

हॉलीवुड चित्रपट ‘लाय बाओ’ म्हणजेच मराठीमध्ये शक्तिशाली, प्रेक्षकांच्या भेटीला ३० ऑगस्ट २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. ही कथा टॅम या कॉमिक कलाकाराची आहे, ज्याला कळते की त्याला एक गंभीर आजार आहे. जगण्याच्या हताशपणात, टॅम प्रायोगिक वैद्यकीय उपचार करण्याचा प्रयत्न करण्यास सहमत होतो आणि उपचारानंतर, त्याला अलौकिक शक्ती प्राप्त होतात. परंतु उपचाराची उत्पत्ती एका गडद इतिहासात गुंफलेली आहे जी त्याच्या आयुष्यात उलगडली जाते.

प्रेक्षकांना उत्तम मनोरंजन मिळावं यासाठी अल्ट्रा झकास मराठी ओटीटी नेहमी विविध संस्कृती आणि भाषांचे चित्रपट आपल्या मातृभाषेत देण्याचा प्रयत्न करत असतो. या ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना हे पाच चित्रपट पहायला मिळतील ज्यामुळे तुमचा दर शुक्रवार तुमच्या कुटुंबासोबत अधिक उत्साह आणि आनंदाने भरलेला असेल, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT