Ishq Vishk Rebound
Ishq Vishk Rebound  sakal
Premier

Ishq Vishk Rebound Review: गुंतता गुंतता विस्कटलेली लव्हस्टोरी; कसा आहे 'इश्क विश्क रिबाउंड'? वाचा रिव्ह्यू

Payal Naik

Ishq Vishk Rebound Movie: दिग्दर्शक केन घोष आणि निर्माते कुमार तौरानी व रमेश तौरानी यांनी सन २००३ मध्ये शाहीद कपूर व अमृता राव यांना घेऊन इश्क विश्क ह चित्रपट बनविला होता. या चित्रपटाद्वारे शाहीद आणि अमृताने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. शाहीदीने या चित्रपटात राजीवची तर अमृताने पायलची व्यक्तिरेखा साकारली होती. एक फ्रेश लव्हस्टोरी या चित्रपटात मांडण्यात आली होती आणि हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. आता त्याच चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचा पुढील भाग म्हणजे इश्क विश्क रिबाउंड आणलेला आहे.

या वेळी दिग्दर्शनाची जबाबदारी निपुण धर्माधिकारी याच्याकडे दिली आहे. या चित्रपटाद्वारे हृतीक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन आणि जिब्रान खान हे दोन नवीन कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. मैत्री,प्रेम आणि ब्रेकअप असा फाॅर्म्युला यामध्ये मांडण्यात आला आहे. आजच्या तरुणाईला आकर्षित करील अशी लव्हस्टोरी आहे. मात्र ती मांडताना गोंधळ उडालेला आहे. ही कथा आहे तीन मित्रांची. राघव (रोहित सराफ), साहिर (जिब्रान खान) आणि सान्या (पश्मिना रोशन) हे बालपणीचे मित्र असतात.

त्यांच्यामध्ये तेव्हापासूनच घट्ट मैत्री असते. मोठे झाल्यानंतर साहीर आणि सान्या एकमेकाच्या प्रेमात पडतात. त्यांच्यामध्ये प्रेम, भांडण वगैरे सतत होत असते. त्यांचा मित्र राघव नेहमीच सावलीसारखा त्यांच्या पाठी उभा असतो. तो त्याच काॅलेजमधील रिया (नायला ग्रेवाल) हिला डेट करीत असतो. त्यांचीदेखील लव्हस्टोरी सुरू असते. त्यानंतर साहीर आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डिफेन्स अकॅडमीत दाखल होते. त्याचे अशा प्रकारे जाणे सान्याला सहन होत नाही आणि त्यांच्यामध्ये ब्रेकअप होतो. त्यानंतर कथानक वेगळे वळण घेते. राघव व सान्या एकमेकांकडे आकर्षित होतात आणि आपल्या नात्याला एक नाव देण्याचा प्रयत्न करतात.

त्याची कुणकुण रियाला लागते आणि तीदेखील भडकते. एकूणच मैत्री, प्रेम, रिलेशनशिप आणि ब्रेकअप अशा प्रकारे कथानक वाटचाल करते. त्यामध्ये अनेक टर्न आणि ट्विस्ट येतात. त्यामुळे चित्रपट आपली उत्सुकता वाढवितो खरा. परंतु पटकथेतील गोंधळामुळे निराश पदरी येते. तसं पाहायला गेलं तर निपुण अविनाश धर्माधिकारी हा एक उत्तम आणि प्रयोगशील दिग्दर्शक आहे. त्याने या चित्रपटामध्ये तरुणाईची भाषा, त्यांचे आचारविचार वगैरे गोष्टी मांडण्याचा आणि स्टाईलबाज चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रेमाची नवीन परिभाषा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु एकूणच या चित्रपटाचे कथानक गुंतता गुंतता गोंधळ उडालेला आहे. रोहित सराफ, जि्ब्रान खान, पश्मिता रोशन आणि नाया ग्रेवाल या कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. रोहित सराफ आणि जिब्रान खान यांचे कौतुक अधिक करावे लागेल. कारण रोहितने राघवची भूमिका समरसून साकारली आहे. मैत्री आणि प्रेम यामध्ये राघवची होणारी घुसमट त्याने पडद्यावर छान रेखाटली आहे. त्याचबरोबर जिब्रान खानने मोठ्या आत्मविश्वासाने साहिलची व्यक्तिरेखा उभी केली आहे.

त्याने या भूमिकेतील विविध रंग व ढंग आपल्या स्टाईलने साकारले आहेत. पश्मिना रोशन मोठी झेप घेईल असे एकूणच तिच्या कामावरून वाटते आहे. नायला ग्रेवालने रियाची भूमिका छान केली आहे. सान्याच्या आईच्या भूमिकेत सुप्रिया पिळगावकर तर आकाश खुराना यांनी राघवच्या वडिलांची भूमिका केली आहे. चित्रपटाच्या संगीताबाबत बोलायचे झाले तर गोरे गोरे मुखडे पे...हे एकेकाळचे सुपरहिट गाणे या चित्रपटासाठी रिक्रिएट करण्यात आले आहे आणि ते उत्तमच झाले आहे.

'छोट दिल पे लगी', 'सोनी सोनी', 'इश्क विश्क' अशी काही गाणी या चित्रपटात आहेत. रोचक कोहलीने संगीत दिले आहे आणि ते सुंदर झाले आहे. सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग यांच्या कॅमेऱ्यामध्ये डेहराडून वगैरेची लोकेशन्स आपल्या कॅमेऱ्यात छान बंदिस्त केली आहेत. मात्र चित्रपटाचा क्लायमॅक्स फारसा उत्कंठावर्धक झालेला नाही. त्यामुळे निराशा पदरी येते. एकूणच हा चित्रपट म्हणजे विस्कळीत कथानक आणि गोंधळात टाकणारी लव्हस्टोरी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahesh Jethmalani: अदानीला संपवण्यासाठी चीन प्रयत्न करतोय का? महेश जेठमलानींचे धक्कादायक खुलासे

ZIM vs IND 1st T20 Playing 11 : शुभमन गिल मित्राला संधी देणार; सीएसकेचा कर्णधार ऋतुराजला बसावं लागणार बेंचवर?

Arun Kanade: ड्रायव्हर ते टीम इंडियाची ड्रेसिंग रुम... विधान भवनात सत्कार झालेले अरुण कानडे आहेत तरी कोण?

BCCI Reply to Aditya Thackeray: "वर्ल्डकप फायनल मुंबई बाहेर नेऊ नका" म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना BCCIचं उत्तर

Maharashtra Live News Updates : माविआचा लवकरच मुंबईत संयुक्त मेळावा होणार

SCROLL FOR NEXT