Jackie Shroff home in Teen Batti area Esakal
Premier

Jackie Shroff : "ते घर मला पुन्हा विकत घ्यायचंय", जुन्या घराच्या आठवणीत रमले जॅकी श्रॉफ ; म्हणाले...

Jackie Shroff revealed his wish to buy his old house in chawl : अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी त्यांचं जुनं घर पुन्हा विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. काय म्हणाले जॅकी श्रॉफ जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Entertainment News : मलबार हिलमधील एका मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेल्या जॅकी श्रॉफ यांनी अल्पावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. जॅकी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या जुन्या घराच्या आठवणी त्यांनी यावेळी शेअर केल्या.

जॅकी यांनी नुकतीच रणवीर अलाहबादीयाच्या चॅनेलवर हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांचं करिअर, त्यांचा इंडस्ट्रीमधील स्ट्रगल पर्यावरणासाठी ते करत असलेले कार्य यावर भाष्य केलं. याबरोबरच ते आयुष्याकडे कसं बघतात याविषयीही ते भरभरून बोलले. यावेळी त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या मलबार हिलच्या तीन बत्ती परिसरातील त्यांच्या चाळीतील आठवणी शेअर केल्या.

जॅकी म्हणाले,"मी अजूनही माझ्या जुन्हा चाळीतील घरात जातोय. टायगर लहान असताना त्यालाही घेऊन गेलो होतो. ती दहा बाय दहाची खोली होती. त्या खोलीत एकदा सापही शिरला होता. माझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी त्या खोलीत दडलेल्या आहेत. एकदा मला त्या खोली उंदीर चावला होता. आम्ही जेव्हा साठीच्या दशकात पहिलं गोदरेज कंपनीचं कपाट विकत घेतलं तेव्हा ते बघायला आमच्या घरी लोकांची गर्दी जमली होती. खूप साधे आणि सुंदर दिवस होते. त्या चाळीत मला भाड्याने का होईना पण एक खोली घ्यायची आहे पण मला आता तिथे कुणी खोली देत नाही. तिथे भाडोत्री राहतो तो सोडून गेल्यावर मिळेल असं मला सांगण्यात आलं पण मला मिळणार नाही हे मला माहित आहे. तो घरमालक आता माझं जून घर विकायलाही तयार नाहीये कारण आता बिल्डिंग पुनर्वसनासाठी जाईल तिथे टॉवर होईल. त्यामुळे आता कुणीही खोल्या विकायला तयार नाही."

जॅकी यांनी यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांवर संस्कार त्यांच्या आई -वडिलांनी केल्याचं सांगितलं. त्यांना कायम प्रत्येकाचा आदर करायला शिकवलं. "मी लोकांशी कसा वागतो हे बघून माझी मुलं शिकली." असं जॅकी यावेळी म्हणाले. जॅकी आता बेबी जॉन आणि सिंघम अगेन या दोन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT