Premier

Janhvi Kapoor: जान्हवीनं आंतरराष्ट्रीय रनवेवर केला डेब्यू; मरमेड लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

priyanka kulkarni

Janhvi Kapoor: फॅशन आणि स्टाईलमुळे बॉलीवुड अभिनेत्री या कायम प्रकाशझोतात असतात, यामध्ये एक नाव कायम घेतलं जातं ते जान्हवी कपूरचं (Janhvi Kapoor). सिनेविश्वात पदार्पण केल्यापासून जान्हवी ही तिच्या फॅशनमुळेही चर्चेत असते. तिच्या हटके लुकची अनेक वेळा चर्चा होत असते. यातच जान्हवी आता फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत भारतातबाहेरही नावलौकिक करताना पाहायला मिळतेय. जान्हवी कपूर पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे लाईमलाईटमध्ये आली आहे.

नुकतच जान्हवी कपूरने आतंराष्ट्रीय रनवे डेब्यू केलाय. पॅरीस हाउते काउचर वीकसाठी (Paris Haute Couture week) तिने खास रॅम्प वॉक केलाय. यावेळी तिने भारतीय फॅशन डिझायनर राहुल मिश्राचं डिझाईनर ड्रेस परिधान केला होता. यावेळी जान्हवीने काळ्या रंगाचा मरमेड स्टाईल स्कर्ट आणि टॉप परिधान केला होता. या लूकमध्ये जान्हवीने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलय. या लूकमध्ये जान्हवीने पॅरीस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. जलपरी साऱखा दिसणारा या ड्रेसचा मरमेड लूक जान्हवीला शोभून दिसत होता. जान्हवीचा हा लूक सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. याआधी याचवर्षी पॅरीस काउचर वीकसाठी अभिनेत्री अनन्या पांडेने देखील रॅम्प वॉक केला होता. अनन्याचं हटके आउटफीट चर्चेचा विषय ठरलं होतं.

नुकताच जान्हवीचा 'मिस्टर एन्ड मिसेस माही' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालाय. या चित्रपटात जान्हवी ही अभिनेता राजकुमार रावसोबत झळकलीय. आगामी काळात 'उलझ' या चित्रपटातही जान्हवी झळकणार आहे. शिवाय 'देवरा पार्ट १'चित्रपटातून जान्हवी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत डेब्यू करेल.

जान्हवीने 'धडक' या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अशी सुरुवातीची ओळख ते आता स्वत:ची वेगळी ओळख ती बनवू पाहतेय. विविध चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर जान्हवीने तिच्या कामाने वेगळा ठसा उमटवला आहे. जान्हवीच्या पदार्पणाआधीच श्रीदेवी यांचं निधन झालं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Election 2024: फ्रेंच निवडणुकीत त्रिशंकू संसदेची शक्यता, एक्झिट पोलमध्ये डावी आघाडी वरचढ

Panchang 8 July : आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण करावे

मोठी बातमी! ‘SEBC’ सवलतीसाठी नव्याने करावा लागणार अर्ज; संभ्रमातील प्रशासन मागविणार मार्गदर्शन; ऐन प्रवेशाच्या मुहुर्तावरील बदलामुळे विद्यार्थी चिंतेत

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे साचले पाणी; 'या' स्थानकांवरील लोकलसेवा विस्कळीत

Sakal Podcast : राज्यात 'या' जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा ते सेबीचा हिंडेनबर्ग रिपोर्टबद्दल मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT