Janhvi Kapoor sakal
Premier

Janhvi Kapoor: आवडता नेता, नेपोटिझम, पापाराझीच्या कॅमेऱ्यामागचं सत्य, इतकंच नाही, तर गांधी आणि आंबेडकरांवर देखील भरभरुन बोलली जान्हवी

priyanka kulkarni

Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकते. जान्हवी लवकरच मिस्टर अँड मिसेस माही (Mr. & Mrs. Mahi) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं सध्या जान्हवी प्रमोशन करत आहे. अशातच जान्हवीनं नुकतीच The Lallantop या युट्यूब चॅनल मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत जान्हवीनं विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे.

पापाराझीबद्दल काय म्हणाली जान्हवी?

पापाराझीबद्दल जान्हवी म्हणाली, "माझ्या चित्रपटाचं प्रमोशन सुरु आहे. त्यामुळे पापाराझीला एअरपोर्टवर फोटो काढायला बोलवलं होतं. पण जेव्हा चित्रपटाचं प्रमोशन नसतं तेव्हा पापाराझीला आम्ही नाही बोलवत. पापाराझी सेलिब्रिटींच्या गाडीला फॉलो करतात. त्यांना प्रत्येक फोटोचे पैसे मिळतात. एखाद्या सेलिब्रिटीचे चित्रपट हिट ठरत असतील तर ते त्यांना फॉलो करतात, पण चित्रपट हिट नसेल तर ते फॉलो करत नाहीत.माझ्या जीमच्या बाहेर देखील पापाराझी असतात. मी पापाराझीला सांगितलं की माझ्या जीमच्या बाहेर प्लिज येऊ नका, मग आता पापाराझी माझ्या जीमच्या बाहेर येत नाही. माझ्या जीमच्या टाइट ड्रेसमध्ये त्यांनी माझे फोटो काढावेत, असं मला वाटत नाही."

जान्हवी कपूरनं आंबेडकर आणि गांधी यांच्याबद्दल मुलाखतीत सांगितलं, "मला वाटते आंबेडकर आणि गांधी यांच्यातील चर्चा पाहणे हे माझ्यासाठी उत्सुकतेचे आहे. एका विशिष्ट विषयावर त्यांची मते कालांतराने कशी बदलत राहिली, हे पाहणे माझ्यासाठी उत्सुकतेचे आहे. या दोघांनीही आपल्या समाजाला खूप मदत केली आहे. आंबेडकर सुरुवातीपासूनच त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्ट आणि ठाम होते. परंतु मला वाटते की गांधींचा दृष्टिकोन विकसित होत गेला कारण त्यांना आपल्या समाजातील जातीय भेदभाव समजत गेला.दुसऱ्या व्यक्तीकडून एखादी गोष्टी कळणे आणि ती गोष्ट स्वत: अनुभवणे यात बराच फरक असतो."

नेपोटिझमबाबत जान्हवी म्हणाली, "माझी आई जेव्हा मला सोडून गेली, तेव्हा माझा पहिला चित्रपट रिलीज झाला होता. लोकांना असं वाटत होतं की, मी श्रीदेवींची मुलगी आहे, म्हणून मला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी आईला चित्रपटाच्या सेटवर न येण्यास सांगितलं होतं. "

तुझा आवडता नेता कोणता आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर जान्हवी म्हणाली, "जो नेता देशासाठी चांगले काम करेल. तो नेता मला आवडेल."

मुलाखतीमध्ये विविध मुद्यांवर बिंधास्त भाष्य केल्यानं सध्या अनेकजण जान्हवीचं कौतुक करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई हादरली! झोपेतच मृत्यूनं कवटाळलं, भीषण आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, लहान मुलांचाही समावेश

मुन्ना यादव कुटुंबात राडा, एकमेकांवर हल्ला; धंतोली ठाण्यात दोन्ही गटांत गोंधळ, परिसरात तणाव

Solar Storm: गंभीर इशारा! अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ, पृथ्वीवर धडकण्याची शक्यता; भारतावर किती होईल परिणाम?

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Navratri Fast Recipe: नवरात्रीत उपवासाला बनवा स्वादिष्ट अन् कुरकुरीत 'Banana Kofta' नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT