javed akhtar esakal
Premier

पहिलं लग्न तुटण्याचं मला दुःख... अखेर ४० वर्षांनंतर जावेद अख्तर यांनी मान्य केली आपली चूक; म्हणाले- त्या सवयीमुळे

Javed Akhtar Talked About First Marriage With Honey Irani:बॉलिवूडचे लोकप्रिय लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या पहिल्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे. आपलं लग्न आपल्या सवयीमुळे तुटलं असं ते म्हणाले.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी शबाना आझमी हिच्याशी दुसरा विवाह केला. ते आनंदात संसार करत आहेत. मात्र त्यांचा पहिला विवाह हनी इराणी यांच्याशी झाला होता. मात्र त्यांचं लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद यांनी आपलं लग्न तुटण्याचं कारण सांगितलं आहे. आपण खूप दारू प्यायचो म्हणून आपलं लग्न तुटलं यात आपल्या पत्नीचा काहीच दोष नाही असं ते म्हणाले. जावेद यांनी सपन वर्मा याच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं.

जावेद अख्तर तरुणांना दारूचं व्यसन टाळण्याचा सल्ला देत म्हणाले, 'मी दारू पिऊन बराच वेळ वाया घालवला आहे. मी मद्यपी होतो. ३१ जुलै १९९१ ला मी दारू पिणं सोडलं. मला वाटतं की मी किमान 10 वर्षे फक्त दारू पिऊन वाया घालवली आहेत. तो वेळ मी इतर काही सकारात्मक आणि सर्जनशील कामासाठी वापरू शकलो असतो. मी तरुणांना सल्ला देईन की, तुम्ही दारू पिणं सोडा, कारण मी माझ्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा दारूशिवाय मी माझ्या आयुष्यात कोणतीही मोठी चूक केलेली नाही.

पहिलं लग्न तुटण्याची खंत

79 वर्षीय जावेद पुढे म्हणाले, 'माझ्या पहिल्या लग्नाच्या अपयशाबद्दल मला खेद वाटतो. ते टिकलं नाही. ते वाचवता आलं असतं. पण ती माझी बेजबाबदार वृत्ती होती, माझी दारू पिण्याची सवय होती… जेव्हा तुम्ही नशेत असता तेव्हा तुम्ही विचार न करता निर्णय घेता, काही अशा गोष्टींबद्दल तुम्ही भांडायला लागता, ज्या फार महत्वाच्या नसतातच. या सर्व चुका माझ्याकडून झाल्या आहेत. माझं लग्न माझ्या चुकीमुळे तुटलं.

शबानासोबत केलं दुसरं लग्न

फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही जावेद यांच्या पहिल्या बायकोची मुले आहेत. म्हणजे त्यांची आणि हनी इराणीची मुलं. त्यानंतर त्यांनी शबाना आझमी याच्याशी लग्न केलं. हे लग्न 1984 मध्ये झालं. दोघांनाही मूलबाळ नाही. तसेच त्यांनी कोणतंही मूल दत्तक घेतलेलं नाही. जावेद नुकतेच 'अँग्री यंग मॅन' या माहितीपटात दिसले होते. त्यात सलीम खानही होते. यात जेव्हा दोघांनी इंडस्ट्रीवर राज्य केलं तेव्हाच्या कथा आहेत. दोघांनी मिळून 24 चित्रपट केले, त्यापैकी 22 ब्लॉकबस्टर ठरले. नम्रता राव यांनी त्यांच्या माहितीपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT