vedaa esakal
Premier

Vedaa Movie On OTT: जॉन अब्राहम, शर्वरी वाघचा ‘वेदा' आता ओटीटीवर; वाचा कुठे आणि कधी पाहता येईल चित्रपट

Payal Naik

जॉन अब्राहम, शर्वरी वाघ यांच्या अभिनयाने सजलेला ‘वेदा, संविधान का रक्षक’चा डिजिटल प्रीमियर होणार आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. खऱ्या घटनांपासून प्रेरित असलेल्या ‘वेदा’ सिनेमात एका दलित मुलीचा जातीवरून होणारा अन्याय आणि गुन्हेगारीविरोधातल्या लढ्याचा प्रवास पाहायला मिळणार आहे. ‘वेदा, संविधान का रक्षक’ हा चित्रपट या दसऱ्याला, 10 ऑक्टोबर रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

‘वेदा, संविधान का रक्षक’ या सिनेमात मेजर अभिमन्यू कन्वर (जॉन अब्राहम) या कोर्ट मार्शल झालेल्या सैन्यदलातल्या अधिकाऱ्याची वेदा (शर्वरी) नावाच्या अन्यायाविरूद्ध सतत संघर्ष करणाऱ्या निश्चयी दलित मुलीशी भेट होते. एकत्रितपणे ते सखोल सामाजिक समस्यांविरूद्ध लढा देतात. कायम दडपशाही करणाऱ्या आणि त्यांना गप्प करण्याची धमकी देणाऱ्या गावच्या प्रमुखाविरोधात – अभिषेक बॅनर्जी यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखेविरोधात हे दोघे लढा देतात. या दोघांना कटू सत्याची माहिती मिळते आणि ते प्रकाशात आणण्यासाठी लढा देतात. या सिनेमात धाडस, चिकाटी आणि न्यायाची दमदार कथा पाहायला मिळणार आहे.

निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केलेला ‘वेदा, संविधान का रक्षक’ अ‍ॅक्शनने परिपूर्ण असून त्यात ठोस सामाजिक संदेश देण्यात आला आहे. या दसऱ्याला, 10 ऑक्टोबर पासून प्रेक्षकांना ZEE5 वर हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये पाहाता येणार आहे - ‘वेदा, संविधान का रक्षक’. याबद्दल बोलताना अभिनेता जॉन अब्राहम म्हणाला, ‘प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या तसेच त्यांना सक्षम करणाऱ्या सिनेमाचा भाग होताना आम्हाला आनंद होत आहे. वेदा सिनेमा स्त्रियांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणारा तसेच आपल्या सर्वांना एकमेकांना सहकार्य करण्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे. हा सिनेमा खूप महत्त्वाचा आणि आजच्या युगाशी सुसंगत आहे. स्त्रियांचा विकास होतो तेव्हा सर्वांचा विकास होतो याची आठवण हा सिनेमा करून देतो. प्रेक्षकांनी ZEE5 वर हा सिनेमा पाहून वेदात देण्यात आलेल्या क्रांतीकारी संदेशाचा अनुभव घ्यावा यासाठी मी उत्सुक आहे.’

तर शर्वरी म्हणाली, ‘ZEE5वर वेदाच्या डिजिटल प्रदर्शनासाठी मी उत्सुक आहे. वेदा बर्वाची व्यक्तीरेखा साकारणं माझ्यासाठी समृद्ध करणारा अनुभव होता. ती समानता व न्यायाचा ध्यास धरणारी आहे. अन्यायाविरोधात उभं राहाण्याची आणि योग्य गोष्टींसाठी लढा देण्याची तिची वृत्ती मला जवळची वाटली. वेदासाठी मिळालेलं कौतुक आणि प्रेम भारावणारं आहे. अशाप्रकारच्या विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सिनेमाचा भाग होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. वेदाचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांनी अनुभवण्यासाठी मी उत्सुक आहे.’ प्रेक्षकांना 10 ऑक्टोबर पासून ZEE5 वर ‘वेदा, संविधान का रक्षक’ पाहाता येईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW : मानलं, Shafali Verma! भारतासाठी ‘करो वा मरो’ सामन्यात विश्वविक्रमाची नोंद अन् स्मृतीसोबत सॉलिड सुरूवात

OBC Reservation: मोठी बातमी! ओबीसींमधल्या १५ जातींचा केंद्रीय सूचीमध्ये होणार समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा हिरवा झेंडा

IND vs BAN: भारताच्या वादळी सुरुवातीनंतरही पॉवरप्लेमध्ये बांगलादेशचं वर्चस्व; सूर्याही स्वस्तात बाद झाल्यानं पहिल्यांदाच असं घडलं

Cabinet Meeting: गेंम चेंजर निर्णय! उद्याच्या कॅबिनेट बैठकीत होणार मोठी घोषणा; नॉन क्रिमिलेयरची मर्यादा...

Ratan Tata: रतन टाटांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

SCROLL FOR NEXT