kajol  esakal
Premier

Kajol Video: बिल्डिंगमध्ये शिरताच स्टाफवर भडकली काजोल; रागीट रूप पाहून नेटकरी म्हणाले- ही पण...

Payal Naik

बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत चांगली वागताना दिसते. मात्र गेल्या काही दिवसांपासुन काजोल एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. आजकाल काजोल तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेच नाही तर तिच्या रागामुळेही चर्चेत असते. अलीकडे तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे. यात ती आपल्या स्टाफवर रागावताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये ती तिच्याच बॉडीगार्डला ढकलताना दिसत होती. आता काजोलचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत आणि काजोलला नेमकं काय झालंय असं विचारत आहेत.

व्हिडिओमध्ये काजोल घाईगडबडीत इमारतीच्या आत जाताना दिसत आहे. आत जाताच ती तिच्या एका कर्मचाऱ्यावर रागावताना दिसत आहे. ती त्याला रागात काहीतरी बोलते, आणि बाहेर इशारा करताना दिसतेय. कर्मचारी शांतपणे उभा राहून ऐकत आहेत. त्यानंतर काजोल सोफ्यावर बसलेल्या व्यक्तीकडे बघते आणि एका गोष्टीबद्दल तिची नाराजी व्यक्त करतेय. यानंतर ती रागाने आत जाते. या व्हिडीओवर यूजर्सच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. ती बाहेर पापाराझींना पाहून रागावली असल्याचा अंदाज अनेक नेटकऱ्यांनी लावला आहे.

एका यूजरने लिहिले की, 'मॅम म्हणाल्या की या भिकाऱ्यांना लवकर हाकलून द्या.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'ही स्त्री अनावश्यक ऍटिट्यूड दाखवते.' दुसऱ्याने लिहिलं, 'ही छोटी जया बच्चन आहे.' आणखी एका यूजरने लिहिलं की, 'ही जया बच्चन यांची कॉपी आहे. प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काजोल 2023 मध्ये 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये दिसली होती. आता ती 'दो पत्ती' आणि 'महाराणी : क्वीन ऑफ क्वीन्स'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'मा' नावाच्या आणखी एका चित्रपटात दिसणार आहे, ज्याची घोषणा अद्याप झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shivsena: विधानसभेची 'ती' जागा शिवसेनेला; भाजपमध्ये अस्वस्थता! पक्षाला घरघर लागण्याची भीती; 'आरएसएस' सह नेत्यांचे वेधले लक्ष

किस्से निवडणुकीचे! विरेंद्र सेहवागची फलंदाजी अन् काँग्रेस उमेदवार आऊट

Edible oil price : खाद्यतेल दरवाढीने कोलमडले नियोजन...ऐन दसरा, दिवाळी सणांच्या तोंडावर महागाईचा भडका

Sharad Pawar: शरद पवारांकडून 11 नेत्यांच्या मुलाखती; तर परिचारिकांनी घेतली फडणवीसांनी भेट

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रात पर्यटनाची अफाट क्षमता: पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT