बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती एक चांगली अभिनेत्री, चांगली आई आणि पत्नीही आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काजोल सोशल मीडियावर नकारात्मक कारणांमुळे चर्चेत आहे. यापूर्वी काजोलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात ती तिच्या स्टाफवर ओरडत होती. त्यावरून नेटकऱ्यांनी तिची तुलना थेट अभिनेत्री जया बच्चन यांच्या वागण्याशी केली होती. आता काजोलचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती इतरांना वाढताना स्वतःच खाताना दिसतेय. इतकंच नाही तर दुसऱ्यांचा फोनही हातानं खाली करताना दिसतेय. यावर नेटकरी देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
काजोलच्या कुटुंबातर्फे चालवल्या जाणाऱ्या नॉर्थ बॉम्बे सर्बोजनीन दुर्गा पूजा पंडालमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात प्रार्थना करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना भोगाचा प्रसाद म्हणून काजोल पुरी वाढताना दिसतेय. साडी नेसून जेवण वाढणाऱ्या काजोलने कॅमेरा धरलेल्या एका व्यक्तीला तिचा व्हिडिओ बनवताना पाहिलं. काजोलने लगेच त्याचा कॅमेरा खाली केला आणि उपस्थितांना तिचा व्हिडिओ न करण्याची विनंती केली. तिने आपण काहीतरी खात आहोत असं इशारा करत सांगितलं. तिच्या अंगरक्षकाने देखील पाहुण्यांना अभिनेत्रीचा व्हिडिओ न करण्याची विनंती करण्यास सुरुवात केली.
मात्र यात काजोलवर चाहते फोन खाली करण्यासाठी रागावले नाहीयेत तर इतरांना वाढताना काजोल खातेय त्यामुळे रागावले आहे. इतरांना प्रसाद वाढताना अभिनेत्री स्वतः काहीतरी खातेय हे अनेक नेटकऱ्यांना पटलेलं नाहीये. त्यामुळे तिच्यावर नेटकरी नाराज आहेत. उत्तर बॉम्बे सर्बोजनीन दुर्गा पूजा पंडाल काजोल आणि राणी मुखर्जी आणि त्यांचे कुटुंबीय व्यवस्थापित करतात. दरवर्षी, चुलत भाऊ दुर्गा मूर्तीचे स्वागत करतात आणि त्यांचे कुटुंब आणि शहरातील इतर लोकांचे मेजवानी करतात. ट्युलिप स्टार हॉटेलमध्ये दरवर्षी हे पंडाल भरवलं जात असे. मात्र, मालमत्ता विकल्यामुळे कुटुंबाने यावर्षी हा सोहळा जुहू येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मैदानावर घेण्याचं ठरवलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.