kakli 2898 ad box office  sakal
Premier

Kalki 2898 AD Box Office: 'जवान'च्या वरचढ ठरला अमिताभ यांचा 'कल्की'; २२ दिवसात केली छप्परफाड कमाई, वाचा एकूण आकडा

Kalki 2898 AD Box Office Collection : दीपिका पादुकोण, प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्या 'कल्की २९८९ एडी' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे.

Payal Naik

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री प्रभास आणि दीपिका पादुकोण यांच्या 'कल्की २८९८ एडी'चा सध्या तिसरा आठवडा सुरू आहे. या आठवड्यातही हा चित्रपट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना टक्कर देताना दिसतोय. या आठवड्यात कल्कीला मोहरमच्या सुट्टीचा चांगलाच फायदा झालेला दिसून आला. आता या आठवड्याच्या कमाईचा आकडा पाहून हा चित्रपट अजूनही दमदार कमाई करताना दिसत आहे. या आठवड्यात तर कल्कीने 'जवान'चा रेकॉर्ड तोडला आहे.

गुरुवारी विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे कल्कीसमोर एक मोठा अडथळा आहे. त्यातही कल्की आता 'जवान'चा रेकॉर्ड तोडताना दिसत आहे. जवानने २२ दिवसात ५८१ कोटींची कमाई केली होती. तर कल्कीने २२ दिवसात ५९९ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे इथे कल्कीने जवानला मागे टाकलं आहे. मात्र जवानची एकूण कमाई अजूनही कल्कीपेक्षा जास्त आहे. जवानने एकूण ६४० कोटींची कमाई केली होती. जर कल्कीची कमाई अशीच सुरू राहिली तर कल्की हा रेकॉर्ड काही दिवसातच तोडू शकतो.

चित्रपटांच्या सर्वाधिक कमाईच्या यादीत 'बाहुबली २' १ हजार ३० कोटींच्या कमाईसह सगळ्यात पुढे आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ८५९ कोटींसह 'केजीएफ' हा चित्रपट आहे. त्यानंतर 'आरआरआर' चित्रपट आहे ज्याने ७८२ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर 'जवान' चित्रपटाचा नंबर आहे. जर कल्कीने हा आणखी ५० कोटींची कमाई केली तर तो जवानला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT