Kalki 2898 AD Esakal
Premier

Kalki 2898 AD : एका साऊथ कोरियन आर्टिस्टच्या आर्टवर्कमधून सीन चोरल्याचा आरोप ; कल्की 2898 AD सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती नाग अश्विनच्या आगामी 'कल्की 2898 AD' या सिनेमाची. या सिनेमाच्या ट्रेलरने सगळ्यांची मनं जिंकली पण प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका साऊथ कोरियन आर्टिस्टने त्याचं आर्टवर्क या सिनेमात कॉपी केल्याचा आरोप लावला आहे. तसे पुरावेही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कल्की सिनेमावर चोरीचा आरोप

सुंग चोई नावाच्या साऊथ कोरियन आर्टिस्टने सोशल मीडियावर या सिनेमासंदर्भात पोस्ट शेअर करत सिनेमाच्या टीमवर चोरीचा ठपका ठेवला आहे. त्याने आजवर नेटफ्लिक्स, डिझने हॉटस्टार , वॉर्नर ब्रोस, मार्वल स्टुडिओजसाठी अॅनिमेशनचं काम केलं आहे. सोशल मीडियावर त्याने स्क्रिनशॉट शेअर करत सिनेमाच्या टीमवर आरोप केले.

कल्की 2898 AD च्या ट्रेलरच्या सुरुवातीच्या सीनमध्ये दिसणारा बिल्डिंग कोसळण्याचा सीन या सिनेमाच्या टीमने त्याच्या आर्टवर्कमधून कॉपी केल्याचं म्हंटलं आहे. त्याने त्याच्या या आर्टवर्कच्या शेअर केलेल्या फोटोमधून दहा वर्षांपूर्वी त्याने हे बनवलं होतं हे दिसून येतंय आणि सिनेमातील त्या सीनमध्येही बऱ्यापैकी साधर्म्य दिसून येत आहे.

कन्सेप्ट डिझायनर आणि इल्युस्टेटर असलेल्या सुंगने सिनेमाची निर्मिती संस्था वैजयंती मुव्हीजवर त्याच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती वापरल्याचा आरोप केला आहे.

कलाकाराने केली टीका

हे आर्टवर्क बनवणाऱ्या सुंग चोई कलाकाराने सिनेमाच्या टीमवर टीका केली आहे. "परवानगीशिवाय कोणतीही कलाकृती वापरणे हा गुन्हा आहे. यामुळे आपण एखाद्या नियम नसलेल्या जगात काम करत आहोत का असा प्रश्न मला पडतो. " असं त्याने म्हणत सिनेमाच्या टीमला टॅग केलं पण काही वेळाने त्याने दिलेलं कॅप्शन डिलीट केलं.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स करत सिनेमाच्या टीमवर टीका केली. "तू लवकरात लवकर कायदेशीर कारवाई कर" अशी प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी सिनेइंडस्ट्रीवर आरोप केले आहेत.

या संदर्भात सिनेमाची टीम काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. २७ जून २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार असून अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हसन यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Suraj Chavan Winning Amount: सुरज ठरला 'BB Marathi 5'चा विजेता; बक्षीस म्हणून मिळाली 'इतकी' रक्कम; आणखी काय काय मिळणार?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

IND vs PAK: भारताला धक्का! पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला, पण कर्णधार हरमनप्रीतला दुखापत

SCROLL FOR NEXT