Kangana Ranaut sakal
Premier

Kangana Ranaut: "कंगना कोण आहे?" अन्नू कपूर यांचा सवाल; पंगा क्विनचा पलटवार; म्हणाली, " महिला सुंदर असेल तर..."

Annu Kapoor: कंगनानं आता अन्नू कपूर यांच्या उत्तरावर प्रतिक्रिया दिली आहे.

priyanka kulkarni

Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) हे सध्या त्यांच्या हमारे बारह या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अन्नू कपूर यांचा हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. अशातच अन्नू यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अन्नू कपूर यांनी चित्रपटाबद्दल चर्चा केली तसेच त्यांना या पत्रकार परिषदेत कंगना राणौतला (Kangana Ranaut) CISF महिला जवानानं थप्पड मारल्याच्या घटनेबद्दल देखील विचारण्यात आलं. यावर अन्नू कपूर यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. अशातच कंगनानं आता अन्नू कपूर यांच्या उत्तरावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अन्नू कपूर?

पत्रकार परिषदेमध्ये अन्नू कपूर यांना कंगना राणौतला थप्पड मारल्याच्या घटनेबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, "कोण आहे ही कंगना? प्लिज मला सांगा ती कोण आहे? साहजिकच तुम्ही विचारत असाल तर मग ती मोठी हिरोईन असेल, ती सुंदर आहे का?"

पत्रकार परिषदेत अन्नू कपूर यांना सांगण्यात आले की, कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार झाली आहे. त्यानंतर अन्नू कपूर म्हणाले,"अरे, ती देखील खासदार बनली का? ती आता खूप पावरफुल झाली आहे. ती सुंदर आहे. कुठल्यातरी अधिकाऱ्याने तिला थप्पड मारली , असं तुम्ही सांगत आहात तर या प्रकरणाची कारवाई करावी."

कंगनाची पोस्ट

कंगनानं अन्नू कपूर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, "आपण अन्नू कपूर जी यांच्याशी सहमत आहात का की, आपण यशस्वी स्त्रीचा तिरस्कार करतो, ती सुंदर असेल तर तिचा अधिक तिरस्कार करतो आणि ती शक्तिशाली असल्यास तिचा अधिक उत्कटतेने तिरस्कार करतो? हे खरे आहे का?"

Kangana Ranaut

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT