Karan Johar Viral Post Esakal
Premier

Karan Johar: 'मेकअप से फितरत नहीं बदलती...' कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्यांना KJo ने फटकारले, वाचा व्हायरल पोस्ट

आशुतोष मसगौंडे

Karan Johar's Viral Post On Plastic Surgery:

फिलर्स, बोटॉक्स, मेकअप आणि प्लॅस्टिक सर्जरी करणाऱ्या लोकांसाठी चित्रपट निर्माता करण जोहरने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक सणसणीत पोस्ट शेअर केली होती. आणि शेवटी लिहिले की, असे प्रकार करणारे लोक अखेर मधमाशीने दंश केल्यासारखेच दिसतात.

चित्रपट निर्माता करण जोहरने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, तो त्याच्या टीव्ही शो आणि ओटीटी शोसाठी देखील चर्चेत असतो. या सगळ्याशिवाय करण जोहरचे वैयक्तिक आयुष्य देखील सतत चर्चेत असते.

"फिलर्स लगालो फुलफिलमेंट नही मिलती... मेकअप लगालो उमर हैं घटती...

करलो जितना भी बोटोक्स, लगोगे जैसे मधुमख्खीने काट लिया...

नाक बदलने से गंध इतार नही बनती, गोईंग अंडर द नाइफ से एक्स्टेरिअर बदल भी जाये

मेकअप से फितरत नहीं बदलती..."

अशा आशयाची पोस्ट करणने इन्स्टावर शेअर केली आहे. यातून त्याने बाह्य सौंदर्याला भूलणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली आहे.

Karan Johar Insta Post

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी करणने अशाच प्रकारची एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये तो त्याच्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल बोलला होता.

“एक साथी के बिना होजाये गुजार, एसी का टेंपरेचर नहीं बदलेगी हमारा। नहीं मिलेगी मोहब्बत, ना सही. सेपरेट बाथरूम का कॉम्प्रोमाइज होगा ही नहीं। मोनोगैमी की डिमांड घंटा होगा पूरा। जिंदगी और ऑप्शन्स कहां मिलते हैं दोबारा। अब तो सिंगल स्टेटस को सेलिब्रेट करो। Anniversary से बेहतर है 'अनादर डेट।''

Karan Johar Insta Post

करण जोहरच्या सध्याच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तो वसंत बालांच्या जिगरा या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. जो सप्टेंबरमध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. यामध्ये आलियाची प्रमूख भूमिका असणार आहे.

करणने सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पाटनी आणि राशी खन्ना यांच्या भूमिका असलेल्या 'योद्धा' चित्रपटाची निर्मिती केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT