kiran gaikwad  sakal
Premier

Devmanus: माझा चेहरा आरोपीसारखा वाटल्याने एका पोलिसाने... किरण गायकवाडने सांगितला 'देवमाणूस' दरम्यानचा किस्सा

Kiran Gaikwad: 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड याने मुलाखतीत मालिकेदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजलेल्या मालिकांमधील एक असणारी लोकप्रिय मालिका म्हणजे 'देवमाणूस'. या मालिकेची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ होती. मालिकेच्या दुसऱ्या भागानेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. गावागावात सगळे ही मालिका पाहण्यासाठी टीव्ही समोर बसायचे. या मालिकेमुळे अभिनेता किरण गायकवाड घराघरात पोहोचला. त्याची लोकप्रियता प्रचंड होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने ही मालिका सुरू असताना घडलेला एक प्रसंग सांगितला. जेव्हा पोलिसांनी त्यांची गाडी अडवली होती.

किरण लवकरच 'डंका' हरिनामाचा' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटानिमित्त त्याने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना किरण म्हणाला, 'आम्हाला अपेक्षित होतं की लोकांनी आपल्या भूमिकेला शिव्या घालाव्या. ते मी एंजॉय करत होतो. कधीकधी मला स्वतःला ते शिव्या घालतायत असंही वाटायचं. पण ठीक आहे ते त्या पात्राचं कौतुक होतं. एकदा काय झालं, म्ही मित्र मित्र कारमध्ये मुंबईहून पुण्याला निघालो होतो. पुण्यामध्ये काय चेकनाके लागलेले असतात रात्रीचे. तर माझ्या मित्रांना मी ड्रॉप करायला निघालो होतो. कागदपत्र वगरे सगळं होतं आमच्याकडे. मित्र म्हणाले, अरे हे बघ पोलीस. मी म्हणालो, मी आहे. घाबरू नका.'

किरण पुढे म्हणाला, 'मी खाली उतरलो आणि त्या पोलिसांनी लगेच हात केला अरे तू, ये ये. त्या पोलिसाने खांद्यावर हात ठेवला वगरे. त्यांनी शेजारच्या पोलीस वाल्याला म्हटलं ते ओळखलं का याला? पलीकडचा पोलिसवाला म्हणाला, कुठल्या गुन्ह्याखाली आत घेतलेला रे याला? चेहरा इतका ओळखीचा वाटतोय मला. दुसरा म्हणाला, ते नाही नाही तो मालिकेतला अभिनेता आहे. मग तो म्हणाला अरे हो हो, देवमाणूस. मग फोटोवगरे काढून दिलं सोडून. असं ते सतत क्राइम करून चेहरा इतका गुन्हेगारासारखा वाटायला लागलेला.' किरण यापूर्वी 'चौक' चित्रपटात दिसला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT