Kiran Mane Exclusive Interview : अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मिडीयावरील वक्तव्य आणि टीकांमुळे चर्चेत असतात. यंदाच्या २०२४ निवडणुकीच्या काळातही किरण माने एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले. किरण माने यांनी यावर्षी राजकारणात एन्ट्री घेतली. हाती शिवबंधन बांधून त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत (Uddhav Thackarey Shivsena) प्रवेश केला. त्यानंतर विविध रॅली,सभांमध्येही त्यांनी भाषणं केली. मात्र त्यानंतर किरण माने यांना नेमकं कोणतं पद मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं.
नुकतीच सकाळ डिजीटल माध्यमला (Sakal Digital) दिलेल्या मुलाखतीत किरण माने यांनी राजकारण आणि पद यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, "माझा फोकस सध्या अभिनयाकडेच आहे, मला अभिनयच करायचाय.कुठलं पद मिळालं किंवा नाही मिळालं मला घेणंदेणं नाही. दिलं पद तर ते मी निष्ठेने करणार आणि शंभर टक्के प्रामाणिकपणे करणार. त्यात कोणताही भ्रष्टपणा येऊ देणार नाही. पद नाही दिलं तरी माझी काही तक्रार नाही. मला फक्त माझं म्हणणं मांडायचय. माझा मूळ श्वास, माझं ध्येय, माझं रक्त माझा अभिनय आहे." तेव्हा भविष्यात राजकारणात पदभार सांभाळण्याची वेळ आल्यास ते निष्ठने करण्याचं किरण माने म्हणतात. शिवाय अभिनयालाच कायम प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
सकाळला दिलेल्या मुलाखतीत राजकारणात येण्याचं मूळ कारण किरण माने यांना विचारलं असता व्यवस्था बदलण्याचा विचार त्यांनी सांगितला. किरण माने म्हणतात की, "राजकारण हा माझा नावडता विषय होता.अलीकडच्या काळात ८ ते १० वर्षात खूप काही वाईट घडत होत होतं. ज्यावेळी राजकारण नात्यात आणि मैत्रीत घुसायला लागलं, तेव्हा मी अस्वस्थ झालो.राजकारण जेव्हा संविधानावर घाला घालायला लागलं तेव्हा मी अस्वस्थ झालो. मी लोकांचे विचार बदलू शकतो पण व्यवस्था बदलू शकत नव्हतो.व्यवस्था बदलण्याच्या कामात मला माझं कर्तव्य करायचं आहे, म्हणून मी राजकारणात यायचं ठरवलं. मला जे म्हणायचंय ते मांडण्याची संधी मला मिळाली प्लॅटफॉर्म मिळाला, प्रचार सभांमध्ये बोलता आलं. आता लोकांना थोडं समतेचं महत्त्व कळायला लागलय. जात आणि धर्म आपले मुलभूत प्रश्न नाहीत.अन्न, वस्त्र, निवारा हे मुलभूत प्रश्न आहेत."
पहा संपूर्ण मुलाखत :
पुढे किरण माने म्हणतात की, "जे भेद करतात त्यांच्या बाजूने मी कसं बोलणार. जे जाती पाती मानतात त्यांच्या बाजूने मी कसं बोलू. माझी बाजू मानवतेची आहे. एकच बाजू ठाम आहे माझी.मानवता हीच श्रेष्ठ आहे."
'मुलगी झाली हो' या स्टार प्रवाह वरील मालिकेतून किरण माने लोकप्रिय झाले होते. या मालिकेतून काढून टाकल्यानंतरचा त्यांचा वादही चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये किरण माने झळकले होते. सोशल मिडीयावरील त्यांच्या वादग्रस्त पोस्टमुळेही किरण माने चर्चेत असतात. सन मराठी वाहिनीवरील नुकत्याच आलेल्या नव्या 'तिकळी' या मालिकेतही किरण माने झळकत आहेत. या मालिकेत ते नकारात्मक भूमिकेत दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.