Kiran Mane Post Esakal
Premier

Ram Mandir : पावसात अयोध्येच्या राम मंदिराला लागली गळती ; 'ज्यावर मतं मागितलीत ते राम मंदिरही धड बांधलं नाही' किरण मानेंचा संताप

सकाळ डिजिटल टीम

Kiran Mane : 'मुलगी झाली हो', 'बिग बॉस मराठी सीजन ४' मधून चर्चेत आलेले किरण माने सोशल मीडियावर परखड मतं व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. सामाजिक, राजकीय विषयांवरही ते बेधडकपणे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतात. सध्या अयोध्येतील राम मंदिर तेथे होणाऱ्या गळतीमुळे पुन्हा चर्चेत आलंय. यावर किरण माने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जानेवारी महिन्यात थाटात उद्घाटन केलेल्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पावसाळा सुरु झाल्यावर मंदिराच्या छतातून गळती होत असल्याची तक्रार केली होती. रामलल्लाची मूर्ती असलेल्या गाभाऱ्यात आणि इतर ठिकाणीही छतातून पाण्याची गळती होत असल्याची माहिती त्यांनी दिली होती. यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता.

किरण माने यांची पोस्ट

यावर प्रतिक्रिया देताना किरण यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते म्हणाले,"शेतकऱ्यांपासून शिक्षणापर्यंत देश देशोधडीला लागलेला आहेच. पण ज्या गोष्टीवर तुम्ही मतं मागितलीत ते राम मंदिरही तुम्हाला धड बांधता आलेलं नाही. एका पावसात गाभारा गळायला लागला. गाभाऱ्यातून पाणी बाहेर काढायचीही व्यवस्था नाही. लज्जास्पद आणि संतापजनक आहे हे. समस्त हिंदूंचा अपमान आहे. लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या. लायक माणूस खुर्चीवर बसवा. जय श्रीराम"

किरण यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचा संताप व्यक्त केला. "रामानेच जागा दाखवली ह्यांना " अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे तर एका युजरने "खर आहे सर" असं म्हणत किरण यांच्या म्हणण्याशी सहमती दर्शवली आहे.

दरम्यान, राम मंदिरातील गळतीचं हे प्रकरण समोर येताच अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बांधलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनात केंद्र सरकारने केलेली घाई, अर्धवट बांधलेल्या मंदिरात केलेली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे सगळे वाद आता पुन्हा डोकं वर काढत असून अनेकांनी याबाबत मोदी सरकारला जाब विचारला आहे. याबाबत केंद्र सरकार आता काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Oneplus Poco Ban in India : भारतात बंद होणार वनप्लस अन् पोकोचे स्मार्टफोन; मोठ्या स्तरावरून होतीये मागणी,नेमकं प्रकरण काय?

IND vs PAK: आज इंडिया-बांगलादेश भिडणार; सामना कधी, कसा, कुठे रंगणार?

Latest Maharashtra News Updates: भारतीय हवाई दलाचा 92 वा वर्धापन दिन; चेन्नईत एअर शो

SCROLL FOR NEXT