Premier

Vinesh Phogat : "देशाच्या अब्रूचे बाहेर धिंडवडे निघाले" विनेशच्या निवृत्तीनंतर किरण मानेंची पोस्ट , सरकारला सुनावले खडेबोल

सकाळ डिजिटल टीम

Kiran Mane : मराठी अभिनेते किरण माने त्यांच्या सडेतोड भाषेसाठी प्रसिद्ध आहेत. आसपास घडणाऱ्या अनेक सामाजिक, राजकीय घटनांवर ते भाष्य करतात.

कुस्तीपटू विनेश फोगाट ला ऑलिम्पिक अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवल्यानंतर याचे पडसाद सर्वत्र उमटले. यामागे भारताच्या सरकारी यंत्रणेचा हात असल्याचा आरोप अनेकांनी केला. यावर अभिनेते किरण माने यांनी पोस्ट शेअर करत यंत्रणांना खडेबोल सुनावले आणि तुमची हुकूमशाही संपूर्ण जगासमोर उघडी पडली असा आरोप केला.

किरण मानेंची पोस्ट

किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हंटल कि,"...यानिमित्तानं संपूर्ण जगातल्या मिडीयावर चर्चा सुरू झालेली आहे ! विनेश फोगाटचा सरकारविरोधातला लढा... ब्रिजभूषणनं केलेलं अनेक कुस्तीगीर महिलांचं लैंगिक शोषण... सत्ताधार्‍यांनी आंदोलन चिरडणं... मेडल्स त्यागणं... या मुलींनी पुन्हा उभं रहाणं... त्यानंतरही यांच्या मार्गात आणलेले अडथळे... जीवघेणा संघर्ष... या गोष्टी ऐकून जग थक्क होतंय. भारतातल्या देशविरोधी भक्तडुक्करांच्या चिखलफेकीचे ट्विटस् सगळं जग अतिशय घृणास्पद नजरेनं पहायला लागलंय.

...देशात बातमी दाबली पण बाहेर अब्रूचे धिंडवडे निघालेले आहेत.

ऐ तानाशाह,
आसाँ नहीं तुझे इंसाफ़ की ज़ंजीर हिलाना...
ये 'दुनिया' है, तेरे बाप का दरबार नही हैं !

- किरण माने."

जगभरात पडसाद

विनेशबाबत ऑलिम्पिकमध्ये जो प्रसंग घडला त्यावरून तिने ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिलेला लढा, क्रीडापटूंनी भारतात केलेली आंदोलन आणि भारतात सध्या सुरु असलेलं राजकारण हे जगासमोर उघड पडल्याचा दावा किरण यांनी पोस्टमधून करत सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.

किरण यांच्याबरोबरच काही सेलिब्रिटींनी आणि क्रीडापटूंनी विनेशबाबत राजकारण खेळलं गेल्याचा आरोप केला आहे.

कुस्तीतून निवृत्ती

दरम्यान विनेशने काल कुस्तीमधून निवृत्ती घेतली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही गोष्ट सगळ्यांना सांगितली. तिच्या या निर्णयाचा धक्का अनेकांना बसला आहे. तिचे चाहते तिने तिचा निर्णय बदलावा अशी मागणी करत आहेत. तर तिचे काका महावीर फोगाट यांनीही विनेशने असा निर्णय घेऊ नये असं वक्तव्य केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: ''काय झाडी.. काय डोंगर... किती हे खोके?'' पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडले पाच कोटी

Karad Assembly Election 2024 : कऱ्हाडला सोनू, नकटा रावळ्यासह बुक्कीत टेंगुळवरही रंगताहेत चर्चा

Sarfaraz Khan: सर्फराज खानला पुत्ररत्न! गोड बातमी सोशल मीडियात व्हायरल

Australia दौऱ्यासाठी भारत A संघाची घोषणा, ऋतुराजच्या हाती कर्णधारपदाची धुरा, इर्श्वरनला दिली मोठी संधी

Melie Kerr: लहानपणी ज्यांच्याबरोबर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न होतं, ज्यावर निबंध लिहिला.... जेव्हा अगदी तसंच घडतं

SCROLL FOR NEXT