kishori shahane  esakal
Premier

लग्नानंतर मुलं नको म्हणणाऱ्या जोडप्यांना किशोरी शहाणेंची शेलक्या शब्दात समज, म्हणाल्या- तुम्ही कधीपर्यंत...

Payal Naik

Kishori Shahane Movies: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या लोकप्रिय अदाकारा किशोरी शहाणे यांनी ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं. अनेक हिट मराठी चित्रपटात झळकलेल्या किशोरी आजही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. त्या नेहमीच आपली मतं स्पष्टपणे मांडताना दिसतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. सध्या अनेक जोडपी लग्नानंतर मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतात. त्यावर किशोरी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

किशोरी यांनी नुकतीच इट्स मज्जाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या, 'आता इंडस्ट्रीपेक्षा कॉर्पोरेटमधली जी जोडपी आहेत ती लग्नच नको असं म्हणतायत किंवा लग्नानंतर मूल नको असं म्हणताना दिसतायत. मूल झालं की जबाबदारी वाढते असे त्यांचे विचार असतात. तर ते प्राणी ठेवतात. मग पेट्स मुलांबरोबर ठेवणं जास्त योग्य आहे. अशाने मुलानांही एक साथीदार मिळतो. पण मुलं नको म्हणून पेट्स ठेवणं हे मला खटकतं.ही सृष्टी आहे. मी जुन्या विचारांची नाहीये पण ही एक परंपरा आहे. प्रॅक्टिकल आहे. आता माझ्यासोबत एक सहकलाकार आहेत ज्या ८० वर्षांच्या आहेत. त्यांनी लग्न केलं नाहीये. आता आजच्या काळात भाऊ बहीण कोण सांभाळणार? प्रत्येकाचे आपले संसार असतात.'

त्या पुढे म्हणाल्या, 'त्या मला विचारत होत्या तू जेवण बनवणारीला किती देते, माझी पाठ हल्ली दुखते मी पण एक बाई ठेवेन. त्या आता एकट्या पडल्यात. सपोर्ट सिस्टम कोण आहे आपल्यासोबत. आपण वर गेलो किंवा जमीवर पडलो आपली फ़ॅमीली आपल्याला सांभाळते. आपल्या आईबाबांनी आपल्याला सांभाळून मोठं केलंय. आई बाबांची काळजी आपण घ्यायची असतेच पण आपली पण तर कुणीतरी काळजी घेतली पाहिजे ना? मला लग्नसंस्था, मुलंबाळ असणं यावर खूप विश्वास आहे. ती नैतिक गरज आहे. ती करावी माणसाने. कितीही तुम्ही खंबीर असल्याचं दाखवलं, मला कुणीच नकोय असं म्हटलं तरी कधीतरी तो माणूस स्वतःशी असं म्हणतोच की नाही आपण वेळेवर सगळं करायला हवं होतं. मला तरी असं वाटतं.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : : पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जनाला १९ तास पूर्ण

Ganesh Visarjan: लाईट घालवली अन् मिरवणुकीवर दगडफेक! 15 गणेश मंडळ रस्त्यावर थांबून, कारवाई केल्याशिवाय विसर्जन न करण्याची भूमिका

Lebanon Pager blasts: मोसादचा प्लॅन! 5 महिन्यांपूर्वीच पेजर्समध्ये ठेवली स्फोटकं, हिजबोल्लाहच्या दहशतवाद्यांचे ठरले काळ

Latest Maharashtra News Updates: उत्तर प्रदेशसह 11 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात कमी वेळेत बनवा बटाटे वड्याचे आप्पे, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT