Kriti Sanon Esakal
Premier

kriti Sanon Controversy : धूम्रपान करणाऱ्या क्रितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ; फॅन्सनी घेतली अभिनेत्रीची बाजू तर आईची जुनी पोस्ट पुन्हा चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

Kriti Sanon : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री क्रिती सेननने कमी कालावधीमध्ये स्वतःचं स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केलं आहे. 'क्रू', 'बरेली कि बर्फी' यांसारखाय सिनेमातील तिच्या भन्नाट अभिनयाचं खूप कौतुक झालं. पण सध्या क्रिती चर्चेत आली आहे तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे. क्रिती सध्या तिच्या वाढदिवसानिमित्त ग्रीसमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. त्याचवेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे काहींनी क्रितीवर टीका केली तर तिच्या चाहत्यांनी तिची साथ दिली.

वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत क्रिती तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धूम्रपान करताना दिसतेय. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हा व्हिडीओ शेअर केला होता. त्या इन्फ्लुएन्सरने हॉटेलचा व्ह्यू दाखवण्यासाठी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही नेटकऱ्यांनी क्रितीला स्पॉट केलं. क्रितीच्या हातात सिगारेटसारखी वस्तू दिसतेय पण व्हिडीओ खूप दुरून घेतलेला असल्यामुळे तिने खरंच धूम्रपान केलं आहे कि नाही हे समजू शकत नाहीये. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटिझन्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या.

रेड्डीट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्रितीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र तिचे फॅन्स तिच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. "तिच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका." असा सल्ला एकाने सगळ्यांना दिला तर एका फॅनने "जोपर्यंत ती अशा गोष्टींचं प्रोमोशन करत नाही तोपर्यंत सगळं ठीक आहे" असं म्हणत तिची बाजू घेतली. तर एकाने "ती तिला हवं ते करतेय त्यात वाईट काय आहे ? ती काही बेकायदेशीर कृत्य करत नाहीये" अशी कमेंट करत तिची बाजू घेतली. तर काहींनी मात्र तिला 'ढोंगी' म्हणत तिच्यावर टीका केली.

क्रितीने या आधी 'बरेली कि बर्फी',''तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमांमध्ये धूम्रपान करतानाचे सीन शेअर केले होते. पण खऱ्या आयुष्यात ती धूम्रपान करत नाही असं तिने अनेक मुलाखतींमध्ये म्हंटलं होतं. त्यामुळेच काही नेटिझन्स तिच्यावर नाराज आहेत.

त्यातच क्रितीच्या आईची जुनी पोस्टही सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी क्रितीने बरेली कि बर्फी सिनेमासाठी धुम्रपान केलं होतं त्यावेळचा तिचा सिगारेटबरोबरच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तेव्हा क्रितीच्या आईने गीता सेनन यांनी ट्विट करत क्रिती कधीच सिगारेट पीत नाही उलट ती दुसऱ्यांना सोडायला सांगते असं म्हंटलं होतं आता ही पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.

Kriti Sanon

दरम्यान, क्रिती परदेशात राहणारा बिझनेसमन कबीर बाहियाला डेट करत असल्याचं म्हंटलं जात आहे. ते दोघे या ग्रीस व्हेकेशनवर एकत्र असून त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आहे. या आधीही त्यांना अनेकांनी एकत्र पाहिलं होतं. कबीर आणि महेंद्र सिंह धोनीचेही चांगले संबंध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT