Krrish 4 Shooting Date Esakal
Premier

Krrish 4: आओ सुनाओ प्यार की एक कहानी... हृतिकच्या चाहत्यांसाठी खुशखबर, या दिवशी सुरू होणार 'क्रिश 4'चे शूटींग

सकाळ डिजिटल टीम

Krrish 4 Shooting Date:

गेल्या काही दिवसांपासून 'क्रिश 4' चित्रपट येणार की नाही याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान आता या चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन आणि प्रमुख अभिनेता हृतिक रोशन सध्या 'क्रिश 4'च्या पटकथेवर काम करत असून, या वर्षाच्या शेवटापर्यंत पटकथा निश्चित होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हृतिक रोशन 2025 मध्ये 'क्रिश 4' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्याची शक्यता आहे.

सध्या हृतिक 'वॉर 2' चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असला तरी, 'क्रिश 4'च्या पटकथेवर तो लक्ष ठेऊन आहे.

दरम्यान राकेश आणि हृतिक यांना प्रेक्षकांसमोर दमदार चित्रपट सादर करायचा आहे. त्यामुळे चित्रपटाची पटकथा अंतिम करण्यासाठी ते वेळ घेत आहेत. जर या वर्षाच्या शेवटापर्यंत पटकथा निश्चित झाली तर 2025 मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.

'क्रिश 4' अंतराळ प्रवासावर आधारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. राकेश आणि हृतिक रोशन 2025 मध्ये 'क्रिश' मालिकेतील चौथ्या भागाचे चित्रीकरण सुरू करण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, चित्रपटाच्या टीमने मोठ्या प्रमाणात संशोधन केले असून आणि त्यानंतर अनेक कल्पना चित्रित केल्या आहेत.

'क्रिश' चित्रपट मालिकेतील पहिला चित्रपट 'कोई मिल गया' होता. ज्यामध्ये हृतिकसोबत रेखा आणि प्रीती झिंटा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट इतका चालला की, प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

'क्रिश 2' मध्ये हृतिक रोशन नायक तर प्रियंका चोप्राची प्रमुख नायिका होती. हा चित्रपटही प्रेक्षकांना तितकाच आवडला होता. त्यानंतर आलेल्या आणि 'क्रिश 3'मध्ये हृतिकसोबत कंगना रणौत आणि विविक ऑबोराय झळकले होते. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा मालिकेतील पुढच्या चित्रपटाकडे लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT