अभिनेता प्रसिद्ध अभिनेता सलमान खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, लॉरेन्स बिश्नोई टोळी सलमान खानच्या हत्येचा कट रचत होती. यासाठी लॉरेन्स टोळी तुर्कस्तानमध्ये निर्मित झिगाना पिस्तुल वापरू शकले असते.
झिगाना पिस्तुलनेच माफिया डॉन अतीक अहमदची आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. अतीक आणि अशरफ यांची हत्या एप्रिल २०२३ मध्ये झाली होती. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, याच पिस्तुलीने पंजाबी गायक सिध्दु मूसेवालीची हत्या करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांच्या पनवेल झोन २ च्या पोलीस उपअधीक्षक विवेक पानसरे यांनी सांगितले की, 24 एप्रिल रोजी चार जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून सलमानच्या हत्येच्या नियोजनाबाबत काही माहिती मिळाली आहे. त्याने सांगितले की, पोलिसांनी चिकना शूटरला बेंगळुरू येथून अटक केली आहे. या लोकांनी काही लोकांसोबत सलमान खानच्या घराची आणि फार्म हाऊसची रेकी केली होती.
सलमान खानच्या घराची रेकी करणारे आरोपी हे लॉरेंन्स बिश्नोई गँगशी संबधित होते. ते सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. या प्रकरणात पोलिस १० ते १२ जणांचा तपास करत आहेत. त्यातबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गँगस्टर आनंदपाल याची मुलगी ही या आरोपींच्या संपर्कात होती. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, अटक केलेले सर्व आरोपींबाबतचे सर्व पुरावे आहेत. ते सर्वजण अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचत होते. या सर्व प्रकरणात अजय कश्यप यांचं देखील नाव समोर आलं आहे, या प्रकरणात ते महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाच पाकिस्तानचा काही संबध आहे का हे देखील तपासले आहे. अजय कश्यप हा शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे काम करतो आणि त्याच्यावर शस्त्रांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आरोपींनी श्रीलंकेला पळून जाण्याची योजनाही आखली होती. लॉरेन्सने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांनी सलमानला Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.