Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीतील दोन लाडकी व्यक्तिमत्त्व म्हणजे सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे. या जोडीने फार कमी सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. सचिन आणि लक्ष्मीकांत ही प्रेक्षकांना आवडणारी जोडी 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमातही दिसणार होती असा खुलासा सचिन यांनी त्यांचं आत्मचरित्र हाच माझा मार्ग एकला मध्ये केला आहे.
२ ० ० ३ मध्ये सचिन यांना गणपतीपुळ्याला गेले असताना नवरा माझा नवसाचा या सिनेमाची कथा सुचली. त्यांनी ही कथा त्यांच्या कुटूंबाला ऐकवली. सगळ्यांना ही कथा आवडली आणि त्यानंतर त्यांनी या सिनेमाचं काम सुरु केलं. या सिनेमाचं त्यांनी आधीच नाव 'चला ना गडे' असं ठेवलं होतं पण नंतर एका प्रेक्षकाच्या सल्ल्यामुळे सचिन यांनी नाव बदललं.
आत्मचरित्रात सचिन यांनी सांगितलं आहे कि, नवरा माझा नवसाचा या सिनेमात त्यांनी सचिन, सुप्रिया, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे काम करणार हे ठरवलं होतं. त्यावेळी लक्ष्मीकांत हॉस्पिटलमध्ये होते आणि खूप आजारी होते. सचिन त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि म्हणाले,"लवकर बरा हो. सप्टेंबरमध्ये आपल्याला सिनेमाचं शूटिंग सुरु करायचं आहे." तेव्हा लक्ष्मीकांत यांनी चकित होऊन विचारलं,"आपल्याला ?" तेव्हा सचिन म्हणाले,"हो, तू माझा सिनेमात काम करायचं आहेस. अजून तीन महिने आहेत, लवकर बरा हो !!" ते ऐकल्यावर लक्षकीत खुश झाले पण एक महिना उलटूनही त्यांच्या तब्येतीत फरक पडला नाही. लक्ष्मीकांत यांच्या आग्रहाखातर सचिन यांनी सिनेमाच्या शूटिंगची तारीख सप्टेंबर महिन्यावरून ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. पण लक्ष्मीकांत यांची तब्येत काही सुधरत नव्हती.
अखेर लक्ष्मीकांत याची सचिन याना बोलावून घेतलं आणि सांगितलं कि डॉक्टरांनी त्याला काम करण्याचा धोका पत्करू नका असं सांगितलं आहे. शेवटी नाईलाजाने सचिन यांना सिनेमाचं शूटिंग सुरु करावं लागल. त्यानंतर काही काळातच लक्ष्मीकांत यांचं निधन झालं.
लक्ष्मीकांत यांच्या जाण्याची सल अजूनही सचिन पिळगावकर यांच्या मनात कायम आहे आणि त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये उघडरित्या बोलून दाखवली आहे. लवकरच 'नवरा माझा नवसाचा २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.