drashti dhami sakal
Premier

Drashti Dhami: लग्नाच्या ९ वर्षानंतर आई बनणार टीव्हीची मधुबाला; नवऱ्यासोबत खास व्हिडिओ शेअर करत दिली गुड न्यूज

सकाळ डिजिटल टीम

Drashti Dhami: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने आता चाहत्यांना गुड न्यूज देत आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. लग्नाच्या ९ वर्षांनंतर ती आई होणार आहे. ही अभिनेत्री आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'मधुबाला' फेम दृष्टी धामी. दृष्टीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दृष्टीने आपण आई होणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. ती लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. तिने नवऱ्यासोबत एक खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. आता चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

दृष्टीने तिच्या नवऱ्यासोबत एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं, 'आता फार वेळ उरला नाहीये. आमच्या या वेड्या घरात आणखी एक छोटासा पाहुणा आमच्यासोबत राहायला येणार आहे. त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम पाठवा. आम्ही ऑक्टोबरपर्यंत वाट नाही पाहू शकत.' या व्हिडिओच्या सुरुवातीलाच ते दोघे एक पोस्टर घेऊन उभे दिसतात. त्यांच्यावर फुगे टाकण्यात येतात आणि त्यांच्या हातातले दारूचे ग्लास घेऊन त्यांना दुधाच्या बॉटल देण्यात येतात. त्यांचा हा क्युट व्हिडिओ चाहत्यांना भावला आहे. त्यांच्यावर चाहते आणि इंडस्ट्रीमधील कलाकार आता शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

दृष्टी आणि नीरज खेमका यांनी २१ फेब्रुवारी २०१५ रोजी लग्नगाठ बांधली होती. या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांसोबतच फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारदेखील उपस्थित होते. लग्नानंतर त्यांनी अनेकदा त्यांच्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. आता ते दोघे नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Fire: नुकत्याच उद्घाटन झालेल्या 'मंडई मेट्रो' स्थानकाला भीषण आग! अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी; आग नियंत्रणात

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT