madhuri dixit  sakal
Premier

Anant Radhika Wedding: अंबानींच्या वरातीत 'चोली के पीछे' गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; डॉ. नेनेही पाहतच राहिले

Madhuri Dixit: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा एक डान्स व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नेटकरीही तिचं कौतुक करतायत.

Payal Naik

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. अनंतची वरात प्रचंड गाजली. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या वरातीत अनेक बॉलिवूड कलाकारांनी डान्स केला. त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने देखील जबरदस्त डान्स केला आहे. माधुरीच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. माधुरीचे ठुमके पाहून तिचे पती डॉ. नेनेदेखील पाहतच राहिले. तब्बल ३१ वर्षानंतर माधुरी तिच्याच गाण्यावर थिरकताना दिसतेय.

अनंत अंबानीच्या वरातीमध्ये माधुरी पती नेने यांच्यासोबत आली होती. त्यात तिचा या कार्यक्रमातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात ती तिच्या १९९३ साली प्रदर्शित झालेल्या 'खलनायक' या चित्रपटातील 'चोली के पीछे' या गाण्यावर नाचताना दिसतेय. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आणि तिचे हावभाव पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. वयाच्या ५७व्या वर्षी माधुरीचा असा डान्स पाहून डॉ. नेनेही चकीत झाले. काहीवेळासाठी तेदेखील आपल्या बायकोकडे पाहताच राहिले. ते तिच्याकडे पाहून प्रेमाने हसताना दिसतायत. नेटकरीही त्यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना दिसतायत.

एकाने लिहिलं, 'माधुरीचे पती मंत्रमुग्ध झालेले दिसतायत.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'ती खूप सुंदर आणि उत्कृष्ट दर्जाची नृत्यांगना आहे. तिचे डान्स स्टेप्स किती भारी आहेत.' आणखी एकाने लिहिलं, 'याला म्हणतात चिरतरुण सौंदर्य, ही एक माणूस म्हणून सुंदर आहे.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'तिच्यासमोर आजकालच्या सगळ्या अभिनेत्री फिक्याच आहेत.' माधुरीच्या डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT