Premier

Eknath Shinde: "कायदा हातात घेणाऱ्यांना सोडलं जाणार नाही"; सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Eknath Shinde: दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या सर्व घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

priyanka kulkarni

Eknath Shinde: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आज (14 एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेवर विविध नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. अशाताच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या सर्व घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, "ही दुर्दैवी घटना आहे.पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही."

मुख्यमंत्र्यांचा सलमानला फोन

गोळीबार घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन केला होता. सलमानसोबत झालेल्या संवादाबद्दल देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले, "सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे. मी सलमान खानशीही बोललो आहे. मी त्यांना सांगितले आहे की सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी काळजी करण्याची गरज नाही."

पोलीस करायत तपास

पहाटे 5 वाजता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये दोन बाईकस्वार दिसत आहेत.या घटनेनंतर पोलीस आणि फॉरेंन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.

गृह खात्यावर सुप्रिया सुळेंची टीका

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गृह खात्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, "हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले-दुधवाले तिथे येतात, त्यांच्या सुरक्षेचं काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT