Salman Khan Firing Esakal
Premier

Salman Khan Firing: मुख्यमंत्री शिंदेंचा थेट सलमान खानला फोन, 'गॅलेक्सी'बाहेर झाला होता गोळीबार.. काय झाली चर्चा?

Eknath Shinde on Salman Khan: मुंबईतील सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी फोनवर संवाद साधला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील वांद्रे येथील अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरून चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानची सुरक्षा वाढवण्याची सूचना केल्या आहेत. सध्या सलमान खानच्या घराबाहेर मोठा पोलीस फौजफाटा आणि फॉरेन्सिक टीम हजर असून तपास सुरू आहे.

गोळीबारानंतर शिंदेंनी सलमान खानला धीर दिला आहे. घाबरण्याचं काम नाही, तुमच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानला सांगितलं आहे.

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावरून विरोधकांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला धारेवर धरले आहे. गोळीबारावर खासदार संजय राऊत ते प्रियंका चतुवेदी आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

५८ वर्षीय सलमान खान आपल्या कुटुंबासोबत राहतो. उत्तर-पश्चिम मुंबईच्या उपनगरातील वांद्रे बीच परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तो राहतो. राजस्थानमध्ये 1998 मध्ये काळवीट शिकारीच्या घटनेनंतर, सलीम खान आणि सलमान खान यांना अनेक वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.

2022 मध्ये, सलीम खानला त्याच्या घराजवळ मॉर्निंग वॉक जाताना एक चिठ्ठी सापडली ज्यावर लिहिले होते, "सलीम खान, सलमान खान, लवकरच तुमचे हाल मूसे वाला सारखे होतील." पंजाबी रॅपर सिद्धू मूसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

सलमान खानला मिळालेल्या धमक्यांनंतर पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्याला बंदूक परवान्यासाठी परवाना देण्यात आला आहे. गेल्या वर्षी, अभिनेत्याने अतिरिक्त सुरक्षा म्हणून नवीन बुलेट-प्रूफ एसयूव्ही खरेदी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT