mahesh kothare speak up at sakal premier awards 2024 over his success Sakal
Premier

Sakal Premier Awards 2024 : माझ्या यशस्वी कारकिर्दीत ‘सकाळ’चाही वाटा; अभिनेते महेश कोठारे

सकाळ वृत्तसेवा

Sakal Premier Awards 2024 : माझा ‘सकाळ’शी सुरुवातीपासूनच खूप घनिष्ठ संबंध आहे. माझ्या यशाच्या कारकिर्दीत ‘सकाळ’चासुद्धा मोठा वाटा आहे. ‘सकाळ’मध्ये माझ्या पहिल्या चित्रपटावरील समीक्षा प्रसिद्ध झाली होती.

त्यानंतर माझ्या कारकिर्दीचे रॉकेट वेगाने सुरू झाले. त्यात आता हा सन्मान देऊन मला अजून ऋणी केले आहे, असे मनोगत प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे यांनी व्यक्त केले.

कोठारे यांना ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड २०२४’ सोहळ्यात विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते कोठारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लक्ष्मीकांत बेर्डे यांना ‘जिवंत’ करायचे आहे...

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा (एआय) वापर करून लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा पडद्यावर जिवंत करायचे आहे. त्यासाठी ‘धडाकेबाज’चे रीमिक्स करत आहे. ‘एआय’द्वारे बेर्डे यांनी भूमिका केलेला बाटलीतील गंगाराम मला जिवंत करायचा आहे, असे ज्येष्‍ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'या' शिल्पकाराने घडवलाय राहुल गांधींनी अनावरण केलेला कोल्हापुरातील शिवरायांचा पुतळा; जाणून घ्या रायगड कनेक्शन

ती कुठेय? सगळे आले पण ती नाही दिसली, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहून नेटकरी करतायत तिची चौकशी

Bigg Boss Marathi 5 : सूरज की निक्की कोण आहे व्होटिंग ट्रेंड्समध्ये आघाडीवर ? घ्या जाणून या सीजनचे फायनल वोटिंग ट्रेंड्स

Used Car Buying Tips: सणासुदीत रिसेल कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक

Latest Marathi News Live Updates : महाविकास आघाडीने ‘आयारामां’ना तिकीट देऊ नये - सुभाष गायकवाड

SCROLL FOR NEXT