Premier

Mahesh Manjarekar: ‘सकाळ करंडक’ मधील कलाकारांना मिळणार चित्रपटात संधी, स्वतः मांजरेकर करणार निवड

सकाळ डिजिटल टीम

Latest Nashik News: ‘सकाळ करंडक’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतील निवडक कलाकारांना चित्रपटांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर स्पर्धा पाहून कलाकारांची निवड करणार आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थी कलाकारांच्या हक्काचे व्यासपीठ असणारी ‘सकाळ करंडक’ ही एकांकिका स्पर्धा नोव्हेंबरमध्ये राज्यभर रंगणार आहे. प्राथमिक, विभागीय अंतिम आणि महाअंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये चुरस रंगणार असून, राज्यभरातील सहा विभागांतील अव्वल संघांमधून स्पर्धेचा ‘महाविजेता’ निवडला जाईल. या स्पर्धेला अश्वमी थिएटर्सकडून विशेष सहकार्य लाभले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या स्पर्धेचे सांस्कृतिक दूत आहेत.

ही स्पर्धा नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नागपूर या सहा केंद्रांवर होणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला ८ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यातून निवडलेल्या संघांमध्ये विभागीय अंतिम फेरी रंगेल. या फेरीत प्रथम पारितोषिक पटकावलेल्या संघाची निवड महाअंतिम फेरीसाठी केली जाईल. प्रत्येक विभागातून निवडलेल्या अव्वल संघांमध्ये महाअंतिम फेरीत ‘सकाळ करंडका’च्या विजेतेपदासाठी चुरस रंगेल. या स्पर्धेची महाअंतिम फेरी १ डिसेंबरला पुण्यात होणार आहे.

----------

स्पर्धेच्या प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

‘सकाळ करंडक’ स्पर्धेचे प्रवेश अर्ज अशोक स्तंभ येथील शहर कार्यालय तसेच सातपूर येथील ‘सकाळ’ कार्यालयात उपलब्ध आहेत. हे प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, ५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश अर्ज जमा करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी अरुण मलाणी (९१७५१८५३३३), दीपिका वाघ (९९७०३००६०१), गणेश जगदाळे (९०७५०१७५०८) यांच्याशी संपर्क साधावा.

एकांकिका स्पर्धांमधूनच उत्तम कलाकार पुढे येत असतात. त्यांना केवळ योग्य व्यासपीठाची आणि योग्य दिशा दाखविण्याची गरज असते. ‘सकाळ करंडक’ ही महाराष्ट्रातील एक मानाची आणि महत्त्वाची स्पर्धा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण कलाकार यात सहभागी होणार आहेत. यातून आम्ही काही निवडक कलाकारांची निवड करणार असून, त्यांना पुढे चित्रपटांमध्ये संधी दिली जाईल.

-महेश मांजरेकर, ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक-अभिनेते

स्पर्धेची वैशिष्ट्ये अशी

-विद्यार्थ्यांना भरघोस रकमेची पारितोषिके

-रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या दिग्गज कलाकारांकडून स्पर्धेचे परीक्षण

-प्राथमिक, विभागीय अंतिम आणि महाअंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये रंगणार स्पर्धा

-प्रथम दोन क्रमांकांच्या विजेत्या एकांकिकांचा स्पर्धेनंतर ‘सकाळ’तर्फे व्यावसायिक प्रयोग

-स्पर्धेपूर्वी अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन

-स्पर्धेतील आश्वासक कलाकारांना स्पर्धेनंतरही मार्गदर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Sabha Election 2024: सुमारे 100 जागांसाठी तब्बल 1,688 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसचा भाव वधारला

गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या सरकारचा निर्णय, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

Dharavi: विरोध, गोंधळ अन् कारवाई; अखेर धारावीतील 'त्या' मशिदीचा वादग्रस्त भाग समितीच्या लोकांनी पाडला

IND vs BAN 2nd Test: चूक झाली भावा! Virat Kohli संतापलेला पाहून Rishabh Pant ने मारली मिठी Video

Anupam Kher: १.३० कोटींच्या नोटांवर गांधींऐवजी अनुपम खेर यांचा फोटो, गुजरातमध्ये मोठा स्कॅम उघडकीस

SCROLL FOR NEXT