Mahesh Manjrekar Esakal
Premier

Mahesh Manjrekar : "मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही हे खोटं...", महेश मांजरेकर यांनी उलगडली सत्यपरिस्थिती , म्हणाले " तो थिएटरमालक..."

सकाळ डिजिटल टीम

Mahesh Manjrekar Interview : मराठी सिनेमा आणि थिएटर मालक यांचा वाद कित्येक वर्षं जुना आहे. मराठी सिनेमांना मुंबईत थिएटर्स मिळत नाहीत यावर अनेकदा मराठी कलाकार आणि निर्मात्यांनी भाष्य केलं आहे. मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पहिल्यांदाच यावर त्यांचं स्पष्ट मत मांडलं.

महेश यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही या कित्येक वर्ष चाललेल्या वादावर भाष्य केलं. ते म्हणाले,"मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही हे मिथ (खोटं) आहे. तो थिएटर मालक कुणाचाच नाही. तो मराठी वाल्याचा नाही, हिंदी वाल्याचा नाही, तामिळ वाल्याचा नाही कुणाचा नाही. तो बघतो माझं ते थिएटर भरलं तर पहिल्या आठवड्यात पन्नास टक्के मिळतील, पुढच्या आठवड्यात ६० टक्के मिळतील, त्याच्या पुढच्या ६५-७० टक्के मिळतील. तुमचा सिनेमा चालला तर तुम्हाला तो व्यवस्थित तारखा काढून देणार. मला नटसम्राट, जुनं फर्निचर या सिनेमांना त्रास झाला नाही. मला असं वाटत महिन्यातून एकदा सगळ्या दिग्दर्शकांनी, लेखकांनी एकत्र यावं आणि आपण कसं काम करावं यावर चर्चा करावी. आपण एकत्र मराठी सिनेमा कसा वर नेऊ शकतो यावर बोललं पाहिजे."

तसंच मराठी सिनेमांना प्रेक्षक संख्या कमी आहे या विधानावरही त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले,"मराठी प्रेक्षक सिनेमाला येतो. पण आपण त्यांना थिएटरपर्यंत आणण्यासाठी काय करतो हे महत्त्वाचं आहे. खरतर तांत्रिकदृष्ट्या आपण इतर इंडस्ट्रीतील सिनेमांशी आपल्या सिनेमाची तुलना करू शकत नाही कारण त्यांनी खूप पैसे खर्च केलेले असतात. पण काही चांगले विषयांवरील मराठी सिनेमे वगळले तर आपल्याकडेही त्याच त्याच विषयावरील सिनेमे बनतात. त्या पलीकडे कधी आपण विचार करतच नाही. आपल्याकडे निर्माते एकत्र येऊन काम करत नाही. अनेक निर्माते एकत्र आले तर आपणही पन्नास कोटींचा सिनेमा बनवू शकू. पण अर्धेजण बजेट ऐकूनच निघून जातात. दुसरी एक गोष्ट जी मला सांगायला वाईट वाटते कि सिनेमा थिएटरला लागल्या लागल्या तो सिनेमा पडला यावर सगळेजण चर्चा करायला उत्सुक असतात. हे खूप चुकीचं आहे. "

महेश यांचा 'जुनं फर्निचर' हा सिनेमा खूप गाजला. यंदा महेश मांजरेकर बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करणार नाहीयेत. याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार; अजित पवार

Ganesh Visarjan 2024 LIVE: लालबागच्या राजाच्या मुख्य द्वारावर तुफान गर्दी, पाहा व्हिडीओ

Narendra Modi Birthday: आज पंतप्रधान मोदींचा ७४ वा वाढदिवस, जाणून घ्या निरोगी राहण्याचा फिटनेस फंडे

Latest Maharashtra News Updates : फडणवीसांनी आरक्षण दिलं बाकी कुठल्याच मराठा मुख्यमंत्री यांना ते देता आलं नाही- चंद्रकांंत पाटील

पती अंघोळच करायचा नाही, फक्त अंगावर गंगाजल शिंपडायचा; लग्नाच्या 40 दिवसातच पत्नीने घेतला घटस्फोट

SCROLL FOR NEXT