navra maza navsacha 2  esakal
Premier

चित्रपट खूपच खराब... 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेत्याने 'नवरा माझा नवसाचा २'ला म्हटलं वाईट; म्हणाला-

Payal Naik

'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाच्या खूप आठवणी प्रेक्षकांच्या मनात आहेत. या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग 'नवरा माझा नवसाचा २' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पहिल्याच विकेंडला या चित्रपटाने ७ कोटी ८० लाखांची कमाई केली. मात्र असं असलं तरी प्रेक्षकांमधून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाहीये. अशातच एका मराठी अभिनेत्याने या चित्रपटाला वाईट म्हंटल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा चित्रपट खूपच वाईट असल्याचं तो म्हणाला आहे. पाहा काय म्हणाला अभिनेता.

navra maza navsacha 2

छोट्या पडद्यावरील कार्यक्रम 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेतील राहुल म्हणजेच अभिनेता ध्रुव दातार याने या चित्रपटाबद्दल भाष्य केलं. इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत त्याने लिहिलं, 'खरंच खूप वाईट चित्रपट आहे.' त्यावर अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला. या चित्रपटाबद्दल बोलताना ध्रुव म्हणाला, '‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाबद्दल मी एक स्टोरी टाकली होती. त्यात मी खूप वाईट चित्रपट आहे असं लिहिलं होतं. त्यानंतर मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले की, तू एक मराठी कलाकार आहेस आणि तू असं नाही बोललं पाहिजेस. अरे पण, मी का बोलू नये? मी फक्त माझं मत मांडलं. मला तो चित्रपट अजिबात आवडला नाही. मी चांगल्या गोष्टीचं नेहमीच कौतुक करतो आणि तो सिनेमा चांगला असता, तर मी नक्कीच कौतुक केलं असतं. पण, तो चित्रपट खरंच खूप वाईट आहे.'

navra maza navsacha 2

पूजे तो म्हणाला, 'मी मराठी अभिनेता आहे म्हणून मी उगाच कौतुक करू का? सॉरी पण, मी असं करू शकत नाही. सचिन सर आणि सुप्रिया मॅमचा प्रश्नच नाहीये. ते छानच आहेत पण, मला स्टोरीलाइन अजिबात आवडली नाही.' असं म्हणत त्याने त्याचं मत मांडलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सकारात्मक विचारसरणीचे फायदे

‘आहारही काटेकोर हवा’

उज्जैनच्या Mahakal Temple ची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती

हॅरी पॉटर फेम आणि ऑस्कर विजेत्या अभिनेत्री Maggie Smith यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण! संस्थेच्या विश्वस्तांसह प्राचार्यांवर आमदार धंगेकरांचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT