Premier

Upcoming Marathi Natak: लवकरच रंगभूमीवर येणार 'हे' मराठी नाटक, दमदार अभिनयाची मिळणार मेजवानी

Marathi theater : कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. सूत्रधार दिनू पेडणेकर आहेत.

Chinmay Jagtap

Marathi Natak Latets Update: :मराठी नाट्यरसिकांसाठी लवकरच हटके शीर्षक असलेलं सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला' हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे.नाटकाचे लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी केले आहे. नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा वेध या नाटकातून घेण्यात आला आहे.

‘सुमुख चित्र’ ही निर्मिती संस्था आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर आणणार आहे. सुमुख चित्र’ संस्थेच्या माध्यामातून आगामी काळात अनेक चांगले सामाजिक विषय नाटकांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केले जाणार आहेत.

नवोदित कलाकार, लेखक-दिग्दर्शक यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज विविध क्षेत्रात यशस्वी पद्धतीने कार्यरत असून आता ही कंपनी ‘सुमुख चित्र’ च्या माध्यमातून नाट्यक्षेत्रात पदार्पण करत आहेत. सुमुख चित्र चे कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. सूत्रधार दिनू पेडणेकर आहेत.अंशुमन विचारे, हेमंत पाटील , सुवेधा देसाई या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत.

‘पाहिले न मी तुला’ या नाटकाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. या मुहूर्त प्रसंगी निर्माते प्रसाद कांबळी, अजय विचारे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून संगीत निनाद म्हैसळकर यांनी केले आहे. प्रकाशयोजननेची जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे. अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT