marathi serial trp  esakal
Premier

Serial TRP: 'बिग बॉस मराठी ५'मुळे बदलली टीआरपी यादी; कोणत्या मालिकेला बसला फटका? मुक्ताने पुन्हा जिंकली मनं

Payal Naik

Serial Trp: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. मात्र या मालिकांचं भवितव्य ठरवतं ते टीआरपी. प्रेक्षकांकडून जास्त पाहिली जाणारी मालिका ही टीआरपी यादीत वरच्या स्थानावर असते. तर प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली मालिका खालच्या स्थानावर. टीआरपी कमी असलेली मालिका लवकर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येतो. तर त्याजागी नव्या मालिकेची वर्णी लागते. गेले वर्षभर टॉप १० मध्ये स्टार प्रवाहावरील मालिकांचं वर्चस्व आहे. स्टार प्रवाहावरील अनेक मालिका या यादीत वर आहेत. मात्र या आठवड्यात 'बिग बॉस मराठी ५' सुरू झाल्याने या आठवड्याच्या यादीत थोडाफार बदल पाहायला मिळतोय.

'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका तिसऱ्या स्थानावर

या आठवड्यात नेहमीप्रमाणे ठरलं तर मग ने आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. तर मुक्ताच्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेने पुन्हा एकदा दुसरं स्थान पटकावलं आहे. त्यानंतर 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. 'शिवानी सुर्वेचं 'थोडं तुझं थोडं माझं' ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. तर रेश्माची 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. 'येडं लागलं प्रेमाचं' आणि 'साधी माणसं ' ही मालिका सहा आणि सातव्या स्थानावर कायम आहेत. तर 'बिग बॉस मराठी ५'मुळे बाकीचे आकडे वरखाली झाले आहेत.

'बिग बॉस मराठी ५'ने टॉप २० मध्ये आपलं स्थान कायम केलं आहे. बिग बॉस मराठीच्या प्रिमिअरने २. ८ आकडयांसह १५ वं स्थान मिळवलं आहे, तर २. ७ आकड्यांसह 'बिग बॉस मराठी ५' १९ व्या स्थानावर आहे. असं असलं तरी बिग बॉस मराठी टॉप १० मध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. यावरही १४ व्या स्थानावर पारू ही झी मराठीकजी मालिका आहे. तर १६, १७ आणि १८ स्थानावरही झी मराठीच्या मालिकांचं वर्चस्व आहे. आता पुढील आठवड्यात या यादीत काही बदल होणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

China Open 2024 : मालविका बन्सोडचा पुन्हा धडाकेबाज विजय; चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

Latest Marathi News Updates : आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅक कोसळला; 42 गाड्यांचे बदलले मार्ग

IIFL Finance: आरबीआयने IIFL फायनान्सला दिला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे, कंपनीच्या शेअर्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT