Heeramandi
Heeramandi  Esakal
Premier

Heeramandi : "तुझ्यात आणि त्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक...";मीनाकुमारींच्या मुलाने दिला शर्मीनला दिलं सडेतोड उत्तर

सकाळ डिजिटल टीम

Sharmin Segal : संजय लीला भंसाळी यांची 'हिरामंडी द डायमंड बझार' ही वेब सिरीज गाजली पण यातील महत्त्वाचं पात्र असलेल्या आलमझेबची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शर्मीन सेगलवर खूप टीका झाली.

शर्मीनने तिने साकारलेल्या पात्राची तुलना 'पाकिजा' सिनेमातील मीनाकुमारी यांच्या अभिनयाशी केली. त्या सिनेमा पासून प्रेरणा घेऊनच ही भूमिका साकारल्याचं तिने म्हंटलं. यावर आता मीना कुमारी यांचा सावत्र मुलगा ताजदार अमरोही यांनी प्रतिक्रिया दिली असून शर्मीनची चांगलीच कानउघाडणी केली.

शर्मीनचं विधान आणि ताजदार यांची प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शर्मीनने स्वतःच्या अभिनयाची तुलना मीना कुमारी यांच्याशी केली. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये शर्मीनने म्हंटलं कि,"मी पाकिजा हा सिनेमा १५-१६ वेळा पाहण्याचा प्रयत्न केला. या सिनेमात मीनाकुमारींनी साकारलेली शून्यता आणण्याचा प्रयत्न मी माझ्या परफॉर्मन्समध्ये आणण्याचा प्रयत्न केला."

तिच्या या प्रतिक्रियेवर ताजदार अमरोही यांनी टीका केली. ते म्हणाले, "'मी शर्मीनला ओळखत नाही. पण तिने जी माझ्या आईवर प्रतिक्रिया देत शून्यतेवर विधान केलं ते मला मान्य नाही. 'हिरामंडी' आणि 'पाकिजा' मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यांची तुलना करू नका. पाकिजा पुन्हा कोणी बनवू शकत नाही. मीना कुमारी आणि कमल अमरोही यांना कुणीही पुन्हा जन्म देऊ शकत नाही. " असं त्यांनी झूम चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

कमल अमरोहींचा भंसाळीनी घेतला आशीर्वाद

भंसाळींविषयी बोलताना ताजदार पुढे म्हणाले कि,"भंसाळी हे माझ्या वडिलांच्या सिनेमाचे खूप मोठे चाहते राहिले आहेत. माझे वडील जसे शॉट चित्रित करायचे तसे करण्याचा प्रयत्न भंसाळी प्रत्येक सिनेमात करतात. १५ वर्षांपूर्वी जेव्हा भंसाळी यांनी कमालीस्तान स्टुडिओला भेट दिली होती त्यावेळी त्यांनी माझे वडील ज्या जागी बसायचे त्या जमिनीवर डोकं ठेवून आशीर्वाद घेतला होता." अशी आठवण त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शर्मीनने स्वतःची तुलना मीनाकुमारी यांच्याशी केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली. या आधीही तिच्या सडेतोड बोलण्यामुळे तिला टीकेचं धनी व्हावं लागलं आहे. अनेक सहकालाकरांनी तिची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे पण तरीही ती प्रेक्षकांचं मन जिंकू शकली नाहीये.

लवकरच हिरामंडी वेब सिरीजचा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीजनमध्ये कोण कलाकार असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture State Award: महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर! CM एकनाथ शिंदे स्वीकारणार ...

Virat Kohli : रोहितला सांगितलं मला काही विश्वास वाटत नाहीये.... पंतप्रधानांशी बोलताना विराटने केला मोठा खुलासा

Team India Prize: महाराष्ट्र शासनाकडून जगज्जेत्या टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस, मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा

Eknath Shinde: "सुर्याचा कॅच कोणी विसरणार नाही तसंच आम्ही 50 जणांनी..."; CM शिदेंची राजकीय फटकेबाजी

Maharashtra Live News Updates : माविआचा लवकरच मुंबईत संयुक्त मेळावा होणार

SCROLL FOR NEXT