Mirzapur 3 sakal
Premier

Mirzapur 3 Cast Fees: ना गुड्डू पंडित ना बीना त्रिपाठी, मिर्झापूर ३'साठी या कलाकाराने घेतलंय सगळ्यात जास्त मानधन

Mirzapur 3 Cast Fees Per Episode Revealed: प्रेक्षकांच्या नजरा आता 'मिर्झापूर ३' कडे खिळल्या आहेत. जाणून घ्या कलाकारांच्या मानधनाबद्दल.

Payal Naik

सध्या सोशल मीडियाला एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे 'मिर्झापूर ३'ची. मिर्झापूर या लोकप्रिय सीरिजचा तिसरा सीझन ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं आहे. सस्पेन्स, थ्रिलर यांसगळ्याचं योग्य मिश्रण असलेला मिर्झापूर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कालीन भैया, गुड्डू पंडित, गोलू, बीना त्रिपाठी सगळेच त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांची झोप उडवणार आहेत. मात्र या सीरिजसाठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

मिर्झापूर ३ च्या कलाकारांच्या मानधनाचा नेमका आकडा समोर आला नसला तरी मागच्या सीझनच्या मानधनापेक्षा त्यांना यावेळेस जास्त मानधन मिळालं आहे. तर काही नवीन चेहरेही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

रसिका दुग्गल

देशी ट्रोल्सच्या माहितीनुसार, रसिका दुग्गल या सीरिजमध्ये बीना त्रिपाठीच्या भूमिकेत दिसतेय. तिने या भूमिकेसाठी प्रत्येक भागाचे २ लाख रुपये घेतले आहेत.

अली फझल

अली फझल या सीरिजमध्ये गुड्डू पंडितच्या भूमिकेत आहे. त्याने प्रत्येक एपिसोडसाठी १२ लाख एवढं मानधन घेतलं आहे.

जितेंद्र कुमार

या सीझनमध्ये अभिनेता जितेंद्र कुमारही दिसणार आहे. त्याने प्रत्येक भागासाठी ४ लाख रुपये घेतले आहेत.

पंकज त्रिपाठी

अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी या सीरिजसाठी सगळ्यात जास्त मानधन घेतलं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या कालीन भय्या यांनी एकूण १० कोटींचं मानधन घेतलं आहे.

श्वेता त्रिपाठी

सीरिजमधील गोलू म्हणजेच अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने मिर्झापूर ३'च्या प्रत्येक भागासाठी २ लाख २० हजार रुपये इतकं मानधन घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT