Umasofiya Shrivastava gives up her Miss Teen Title USA 
Premier

Umasofia Shrivastav : 17 वर्षाच्या उमासोफिया श्रीवास्तवचा मोठा निर्णय, परत केला मिस टीन यूएसएचा मुकुट; नेमकं कारण काय?

Umasofia Shrivastava gives up her Miss Teen Title USA : भारतीय मेक्सिकन वंशाच्या उमासोफिया श्रीवास्तवने तिचा मिस टीन यूएसए हा किताब परत केला आहे. काय आहे यामागील कारण जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय-मेक्सिकन वंशाची असलेल्या उमासोफिया श्रीवास्तवने तिला गेल्यावर्षी देण्यात आलेला मिस टीन युएसए किताब परत केला आहे. 2023 मध्ये तिने मिस टीन युएसए स्पर्धेत भगत घेत विजेतेपद मिळवलं होतं तेव्हा तिला या किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं.

मिस यूएसए विजेती नोएलीया वोईगटने मानसिक तब्येत बरी नसल्याकारणाने तिचा 'किताब परत केल्यानंतर अवघ्या दोन दिवसात उमसोफियाने तिचा निर्णय जाहीर केला.

"संस्थेच्या दिशेशी तिची वैयक्तिक मूल्ये जुळत नाहीत." असं उमसोफियाने पुरस्कार परत करताना म्हंटलं. तिने हा पुरस्कार केल्यानंतर मिस टीन यूएसएच्या संस्थेने इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिचे तिने दिलेल्या सेवेसाठी आभार मानले. "या किताबाचा राजीनामा देण्याचा उमसोफियाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही आदर करतो आणि तिने दिलेल्या सेवेसाठी आम्ही तिचे आभार मानतो. या पुरस्कार विजेत्यांचं हित ही आमची मुख्य जबाबदारी आहे." असं त्यांनी पोस्टमध्ये म्हंटल.

"या किताबाच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्यासाठी आम्ही योजना आखत असून लवकरच नवीन मिस टीन यूएसए निवडली जाईल." अशी घोषणाही त्यांनी यावेळेस केली.

हा निर्णय जाहीर केल्यानंतर उमासोफियाने ती शिक्षणक्षेत्राशी संबंधित तिचं काम सुरु ठेवेल असं म्हंटलं आहे. मिस टीनचा किताब जिंकण्यापूर्वी उमासोफियाने द लोटस पेटल फाउंडेशन आणि द ब्रिज ऑफ बुक्स फाउंडेशन या संस्थांसोबत काम केलं आहे आणि या संस्थांसोबत पुढे काम करणं ती सुरु ठेवणार असल्याचंही तिने यावेळी जाहीर केलं. उमाने द व्हाईट जॅग्वार हे पुस्तक लहान मुलांसाठी लिहिलं आहे आणि पुढेही अशीच काही पुस्तकं लिहिण्याची तिची इच्छा आहे.

Umasofiya post about resignation

नोएलीया वोईगटनेही दिल्या उमसोफियाला शुभेच्छा

उमाने तिचा किताब परत केल्याची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करताच अनेकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. तर मिस यूएसए टायटल विजेती नोएलीया वोईगटने या पोस्टवर कमेंट करत "आय लव्ह यु. मला तुझ्यावर गर्व आहे" असं म्हणत तिच्या निर्णयासाठी तिला पाठींबा दिला.

उमासोफिया आणि नोएलीयाने किताब परत करण्यामागचं खरं कारण जरी जाहीर केलं नसलं तरीही संस्थेशी असलेले मतभेद यामागचं कारण असल्याची चर्चा आहे.

noelia reply on umasofiya's post

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT