Mission Impossible Esakal
Premier

Mission Impossible : मिशन इम्पॉसिबलचं बजेट वाढलं ; 'इतके' करोड खर्च होणार या सिनेमावर, पाणबुडीने वाढवलं बजेट?

सकाळ डिजिटल टीम

हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझच्या गाजलेल्या मिशन इम्पॉसिबल फिल्म फ्रँचायझीमधील आठव्या फिल्मसाठी फॅन्सना अजून थोडी वाट पाहावी लागणार असल्याचं म्हंटलं जातय. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पाणबुडीमध्ये शूट करताना आलेल्या अडचणीमुळे सिनेमाचं शूटिंग अजून काही काळ लांबणार आहे.

हे शूटिंग करण्यासाठी २०७.८ करोड रुपये (२५ मिलियन डॉलर्स) खर्च झाले होते. अनेक मीडिया हाउसेसनी दिलेल्या वृत्तानुसार, १२० फुटांचं स्ट्रक्चर खाली करण्यासाठी वापरला गेलेला जिम्बल त्याच्या वजनामुळे अडकला आणि त्याची आता दुरुस्ती करावी लागणार आहे. ""

निर्मातेही वैतागले

यामुळे सिनेमाचं शूटिंग अजून काही आठवड्यांसाठी वाढलं असून त्यामुळे सिनेमाच्या बजेटमध्येही वाढ झालीये. आधीच या सिनेमाचं बाहेर ३३२४.८८ करोड रुपये म्हणजेच जवळपास ४०० मिलियन डॉलर्स इतकं आहे आणि आता ते अजून वाढणार आहे.

"सिनेमाची निर्मिती प्रक्रिया लांबल्यामुळे सिनेमाचा खर्च वाढला असून त्यासाठी त्यांना प्रतयेक दिवशी कित्येक डॉलर्स खर्च करावे लागत आहेत." असं मिररला दिलेल्या मुलाखतीत सूत्रांनी सांगितलं.

सिनेमाच्या निर्मितीत सुरुवातीपासून अडचणी

क्रूझ या सिनेमाच्या आठव्या भागातही इथान हंटची भूमिका साकारणार असून हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग पार्ट वनचा सिक्वेल आहे. विशेष म्हणजे सिनेमाचं शूटिंग सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून टीमला काही ना काही अडचणीचा सामना करावा लागतोय.

सुरुवातीला या सिनेमाला सिनेलेखकांच्या उपोषणाचा फटका बसला. यामुळे सिनेमाचं शूटिंग काही काळ लांबलं त्यानंतर आता आलेल्या अडचणीचा सामना करावा लागतोय.

सिनेमाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलली

या सिनेमाचं रिलीज खरंतर या वर्षी होणार होतं पण सतत येणाऱ्या अडचणीमुळे दिग्दर्शक ख्रिस्तोफर फक्त ४० टक्केच सिनेमा पूर्ण करू शकले आहेत. या सिनेमातील अत्यंत कठीण सीन्स अजून शूटिंग व्हायचे बाकी असून यामुळे शूटिंग अजून पुढे ढकललं जाणार का? याची चिंता सिनेमाच्या निर्मात्यांना सतावतेय.

२०२४ मध्ये अडचणींमुळे शूटिंग पूर्ण होत नसल्याने निर्मात्यांनी सिनेमा मे मध्ये पूर्ण करण्याचा निर्णय घेतला पण अडचणी संपण्याचं नाव घेत नसून आता सिनेमा कधी रिलीज करायचा हा प्रश्न सिनेमाच्या निर्मात्यांना सुद्धा पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT