Premier

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

Ashwini Vaishnav: मिथुन यांचा सिनेसृष्टीतील प्रवास गौरवास्पद होता. त्यांचा सुपरहिट सिनेमांमध्ये डिस्को डान्सार, अग्निपथ यांचा समावेश आहे. मिथुन यांचा जन्म कोलकाता येथे झाला. पुढे ते सिनेसृष्टीत दाखल झाले आणि आपल्या अदाकारीने सर्वांनाच भुरळ घातली.

संतोष कानडे

नवी दिल्लीः हिंदी सिनेसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या सिनेमामधील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके परस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ७० व्या नॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करत सांगितलं की, कोलकाताच्या रस्त्यांवरुन मजल मारत चित्रपटांच्या विश्वात उंची गाठून मिथुनदा यांनी प्रत्येक पिढीला इन्स्पायर केलं आहे. मला आज घोषण कताना अभिमान वाटतोय की, दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने मिथुन चक्रवर्ती यांना इंडियन सिनेमांमध्ये त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिथुन यांचा सिनेसृष्टीतील प्रवास गौरवास्पद होता. त्यांच्या सुपरहिट सिनेमांमध्ये डिस्को डान्सर, अग्निपथ यांचा समावेश आहे. मिथुन यांचा जन्म कोलकाता येथे झाला. पुढे ते सिनेसृष्टीत दाखल झाले आणि आपल्या अदाकारीने सर्वांनाच भुरळ घातली.

मिथुन चक्रवर्ती जसे अभिनेते आहेत तसेच ते निर्माते आणि राजकारणीदेखील आहेत. त्यांनी आजवर ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या. यात त्यांनी हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, पंजाबी या विविध भाषांमध्ये काम केलं. त्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात मिथुन छोट्या-छोट्या भूमिकांमध्ये दिसले. दो अंजाने, फूल खिले है गुलशन.. या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. १९७९ मध्ये रिलीज झालेल्या सुरक्षा या कमी बजेटच्या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. पुढे चित्रपट लव्ह मॅरेजमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मिथुन यांनी हमसे बढकर कौन, द एंटरटेनर, त्रिनेत्र, अग्निपथ, हम से है जमाना, वो जो हसीना, इलान, जोर लगा के, डिस्को डान्सर, टॅक्सी चोर में यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT