Munjya Movie Child artist
Munjya Movie Child artist  sakal
Premier

Exclusive: मुन्नीसाठी वेडा, 'मुंज्या' म्हणून हिट झाला; मराठमोळ्या आयुषला कशी मिळाली गोट्याची भूमिका? स्वतः सांगितला अनुभव

सकाळ डिजिटल टीम

Munjya Movie Cast: दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा 'मुंज्या' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. अस्सल कोकणातील आगळीवेगळी कथा, चित्रीकरण, मराठी कलाकार, संवाद या सगळ्यांमुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला. या सगळ्यात गाजतायत ते चित्रपटातील मराठी कलाकार. त्यातही चित्रपटातील मुंज्याची म्हणजेच बालकलाकाराची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. मुंज्या म्हणजेच चित्रपटात गोट्याची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचं देखील खूप कौतुक होतंय. मात्र त्याला ही भूमिका नेमकी मिळाली कशी हे त्याने सकाळ डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

चित्रपटात गोट्या ही भूमिका साकारली आहे बालकलाकार आयुष उलागड्डे याने. या भूमिकेबद्दल सकाळशी बोलताना आयुष म्हणाला, 'कोल्हापुरात एक शिंदे अकॅडमी आहे तिथे मी अभिनय शिकायला जातो. त्यांच्याकडे या भूमिकेसाठी कुणी मुलगा आहे का अशी विचारणा झाली होती. त्यावर सरांनी सगळ्या मुलांची प्रोफाइल दिली होती. त्यातून त्यांना माझा चेहरा या भूमिकेसाठी योग्य वाटला आणि त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. मी यासाठी तीनवेळा ऑडिशन पास केल्या. त्यानंतर माझी लूक टेस्ट करण्यात आली आणि माझं सिलेक्शन झालं. हे सगळं शूटिंग कोकणात झालं. पण तिथे जाताना मला थोडी भीती वाटत होती.'

पुढे बोलताना आयुष म्हणाला, 'तिथे सगळे होते. आई माझ्यासोबत शूटिंगला यायची. पण मी पहिलाच असा भुताचा चित्रपट करत होतो तर सुरुवातीला मला थोडी भीती वाटत होती. पण माझे आणि खुशीचे म्हणजे माझी जी बहीण दाखवलीये तिचे सेटवर खूप लाड व्हायचे. पहिल्याच दिवशी त्यांनी आम्हाला आमच्या नावाच्या बॉटल दिल्या होत्या ज्यावर माझं गोट्या असं नाव होतं आणि त्यात चॉकलेट्स वगरे होते. खूप काही होतं. आता सगळे कौतुक करतायत तर खूप छान वाटतंय. सगळेच म्हणतायत की तुझं काम आम्हाला आवडलं. काहींना माझं रागावणं आवडलं, काहींना माझं वेड आवडलं. मलाही खूप भारी वाटतंय. आयुष सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'इंद्रायणी' या मालिकेत झळकत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Closed: ठाणे, नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं निर्णय

Rain Update: पुन्हा पावसाला सुरूवात; मुंबईसह राज्यासह या भागात 'रेड अलर्ट', हवामान विभागाने दिला सर्तकतेचा इशारा

मुलींच्या मोफत शिक्षणाचा जीआर निघाला! ईडब्ल्यूएस, ओबीसी व एसईबीसी प्रवर्गातील मुलींनाच १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कमाफी

CNG -PNG Price: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; CNG-PNGच्या दरात होणार वाढ, जाणून घ्या नवे दर

Russia-Ukraine War: रशियाने कीवमध्ये मुलांच्या रुग्णालयावर डागलं क्षेपणास्त्र, 24 जणांचा मृत्यू; अनेक मृतदेह गाडले, बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT