Nach Ga Ghuma Official Trailer: परेश मोकाशी दिग्दर्शित नाच गं घुमा (Nach Ga Ghuma) या सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे आहे. मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि नम्रता संभेराव (Namrata Sambherao ) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पाहायला अनेकजण उत्सुक आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. घरवाली आणि कामवालीची युनिक गोष्ट असणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर सध्या चांगलाच चर्चेत आहे.
ऑफिस आणि घर हे दोन्ही सांभाळत संसाराची कसरत सांभाळणारी राणी आणि तिच्या संसारात हातभार लावत तिच्या घरी काम करणाऱ्या आशा ताई यांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे हे या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. मालकीण आणि मोलकरीण यांचं नातं, त्यांची मैत्री, त्यांची होणारी भांडणं आणि घरातील सगळ्यांचे त्यांच्याशी असणारे घट्ट बंध या ट्रेलरमधून अधोरेखित होतात. राणीचं आशाताईंशी असणारं नातं, त्या दोघींचं एकमेकांवर अवलंबून असणं, नवीन कामवालीसाठी राणीची सुरु असणारी शोधाशोध, आशाताई सोडून गेल्यावर राणीची होणारी तगमग याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
सुप्रिया पाठारे आणि सुकन्या मोने यांनी अनुक्रमे राणीच्या सासू आणि आईची भूमिका साकारली असून त्यांच्या कॉमेडी सेन्सने सिनेमात जान आलीये आणि याची झलक ट्रेलरमध्येच पाहायला मिळते. तर मायरा आणि सारंगची बापलेकीची धमाल केमिस्ट्रीने सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. याशिवाय ललित प्रभाकर आणि कविता मेढेकर एका विशेष भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तर हास्यजत्रा फेम ईशा सुद्धा या सिनेमात काम करतेय.
घराची महाराणी आणि तिची स्वप्न पूर्ण करणारी परीराणी यांची ही अनोखी गोष्ट १ मे २०२४ पासून सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे आणि परेश यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर या सिनेमाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि स्वप्नील जोशी यांनी केली आहे.
सिनेमाचा टायटल ट्रॅक सगळीकडे गाजत असतानाच आता ट्रेलरसुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकतोय. परीराणी आणि महाराणीच्या गोष्टीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.