Ashok Saraf sakal
Premier

Ashok Saraf: अशोक मामांच्या घरावर लावलेल्या नेमप्लेटनं वेधलं लक्ष; फोटो शेअर करत सुनील बर्वे म्हणाले, "एकदा खात्रीच करून घेतली..."

priyanka kulkarni

Ashok Saraf: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. अशोक मामांनी फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. अशातच आता अशोक सराफ यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो अभिनेते सुनील बर्वे (sunil barve) यांनी शेअर केला आहे. या फोटोमधील नेमप्लेटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सुनील बर्वेंनी शेअर केला सेल्फी

सुनील बर्वे यांनी नुकताच एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये अशोक मामांसोबत निवेदिता सराफ देखील दिसत आहे. या सेल्फीमध्ये अशोक मामा यांच्या घरावर लावलेली नेमप्लेट देखील दिसत आहे. या नेमप्लेटवर लिहिलं आहे, "धनंजय माने इथेच राहतात...श्री अशोक सराफ (द वरजिनल हास्यसम्राट)"

सुनील बर्वे यांनी अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांच्यासोबतचा सेल्फी शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "काल एकदा खात्रीच करून घेतली!! ते नक्की इथेच रहातात!"

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

सुनील बर्वे यांनी शेअर केलेल्या सेल्फीवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं या सेल्फीवर कमेंट केली, "वा छान मस्त" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "हे कसलं गोड आहे"

अशी ही बनवाबनवी या चित्रपटात अशोक सराफ यांनी धनंजय माने ही भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिकेला विशेष पसंती मिळाली. अशी ही बनवाबनवी हा अनेकांचा ऑल टाइम फेवरेट चित्रपट आहे. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retention : MS Dhoni अनकॅप्ड खेळाडू, परदेशी खेळाडूंवर बंदीची तलवार... BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

IND vs BAN 2nd Test : दुसऱ्या दिवसावर पडलं पावसाचं पाणी, भारतात ९ वर्षांनी पहिल्यांदाच असं झालंय

Manoj Jarange: यंदा मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'येथे' होणार भव्य-दिव्य कार्यक्रम, उद्या बीडमध्ये बैठक

IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

SCROLL FOR NEXT