Tanushree Dutta Me Too Movement: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने २०१८ साली मी टू हे कॅम्पेन सुरू केलं होतं. या कॅम्पेनमध्ये तिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर शारीरिक शोषण केल्याचे आरोप केले होते. २००८ साली 'हॉर्न ओके प्लिज' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याने तिच्यासोबत गैरवर्तणूक केली होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेते नाना पाटेकर यांनी या प्रकरणावर उत्तर दिलं आहे. तनुश्रीचे आरोप खोटे आहेत हे आपल्याला ठाऊक होतं त्यामुळे त्यावर मी तेव्हा काहीच बोललो नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
२०१८ साली भारतात MeToo Movement ची सुरुवात केली होती. तेव्हा तिने नाना पाटेकरांवर शारीरिक शोषणाचे आरोप केले होते. २००८ साली आलेल्या 'हॉर्न ओके प्लीज' च्या एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानांनी आपलं शोषण केलं असं तिने म्हटलं होतं. चित्रपटातील एक गाणं एकाच अभिनेत्यावर चित्रित केलं जाणार होतं मात्र नाना शूटिंग दरम्यान सेटवर हजर राहायचे.
नाना 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, 'हे सर्व खोटं आहे हे मला माहीत होतं. म्हणूनच मला राग आला नाही. हे सगळं खोटं असताना मला राग का यावा? आणि त्या सर्व गोष्टी जुन्या आहेत. झालं ते झालं. मी त्याच्याबद्दल काय बोलू शकतो? सगळ्यांना सत्य माहीत होतं. असं काहीही घडलं नसताना मी काय बोलू शकतो? अचानक कोणी म्हणेल तू हे केलंस, तू ते केलंस. या सगळ्या गोष्टींना मी काय उत्तर देऊ? मी ते केलं नाही असं म्हणायला हवं होतं का? मी काहीही केलेलं नाही हे मला माहीत आहे.'
यासोबतच नानांनी या मुलाखतीत आपल्या कुटुंबाबद्दलही सांगितलं. ते म्हणाले कितें एका दिवसात ६० सिगारेट प्यायचे मात्र बहिणीमुळे त्यांना ती सोडावी लागली. सोबतच त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाच्या मृत्युबद्दलही भाष्य केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.