nana patekar rishi kapoor
nana patekar rishi kapoor  sakal
Premier

Nana Patekar:'आणि ऋषीने घाणेरड्या शिव्या द्यायला सुरुवात केली...', नाना पाटेकरांनी सांगितलं सेटवर नेमकं काय घडलेलं

Payal Naik

Nana Patekar On Rishi Kapoor Behaviour: बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसोबतच बॉलिवूडची गाजवलं. त्यांनी नेहमीच स्वतःच्या तत्वांवर विश्वास ठेवला. सुरुवातीला त्यांनाही अनेक भूमिकांसाठी डावललं गेलं होतं. मात्र केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आता नानांनी दिलेली एक मुलाखत प्रचंड गाजतेय. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यावरही भाष्य केलंय. याच मुलाखतीत त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे जेव्हा ऋषी यांनी त्यांना शिवीगाळ केली होती.

नाना आणि ऋषी यांनी 'हम दोनो' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या दरम्यान त्यांची बाचाबाची झाली होती. या चित्रपटादरम्यान ऋषी यांनी नाना पाटेकरांना शिवीगाळ केली होती. नाना यांनी नुकतीच लल्लनटॉपला मुलाखत दिल. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, 'ऋषी सेटवर खूप शिव्या द्यायचा. त्याला राग खूप यायचा. कोणत्याही सीनसाठी तो फक्त एकदाच शूट करायचा. दुसरा टेक घ्यायला सांगितला तर म्हणायचा मी तुमच्यासारखा नाटकी माणूस नाही. दुसरा टेक द्यायला लागला तर म्हणायचा, काय फालतूपणा लावलाय.' असाच एकदा चित्रपटातील एक सीन मला आवडला नव्हता.'

पुढे नाना म्हणाले, 'मी दुसरा टेक घ्यायला सांगितला तर तो मला लगेच म्हणाला, डायरेक्टर कोण आहे? तू की शफी? त्यानंतर म्हणाला, याला काढून टाका रे. कसाबसा त्याने दुसरा टेक दिला. त्याचं हे वागणं पाहून मी म्हणतो, हा काय मूर्खपणा आहे चिंटू? त्यावर त्याने अर्वाच्च शब्दात मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. पाचव्या टेकनंतर तर तो मला थेट मारायला निघाला होता. पण तो टेक चांगला झाला होता.' याच मुलाखतीत नानांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amritpal Singh: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहला पॅरोल मंजूर, ५ जुलैला घेणार लोकसभा सदस्यत्वाची शपथ

Hathras Stampede: हाथरस येथील चेंगराचेंगरीचं कारण येणार समोर? तज्ज्ञांमार्फत चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Share Market Closing: गुंतवणूकदार मालामाल! शेअर बाजार विक्रमी उच्चांकाच्या जवळ बंद; कोणते शेअर्स वधारले?

Maharashtra Live News Updates : अंबादास दानवेंचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांच्या दालनात पुन्हा बैठक

Manipur violence: "1993 मध्येही असाच हिंसाचार झाला होता, तेल ओतणाऱ्यांनी शांत बसा...."; PM नरेंद्र मोदी मणिपूरवर राज्यसभेत बोलले!

SCROLL FOR NEXT