nana patekar said that he and anil kapoor not part of Welcome 3  Sakal
Premier

Welcome 3 : म्हणून मजनू भाई अन् उदय भाईची जोडी 'वेलकम-3' मध्ये नसणार; नाना पाटेकर यांनी स्वत:सांगितलं कारण

Welcome to the Jungle : मात्र यात नाना पाटेकर आणि अनिल कपूर ही जोडी नसणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये यााविषयी नाना पाटेकर यांनी खुलासा केला. त्यांना या वेळेस या चित्रपटासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Welcome 3 : ‘वेलकम’ आणि ‘वेलकम २’ या दोन्ही चित्रपटांत नाना पाटेकर आणि अनिल कपूर ही जोडी प्रचंड गाजली. या चित्रपटातील ‘कंट्रोल उदय’ हा नाना पाटेकरांचा खास अंदाज सर्वांना आवडला. आता लवकरच वेलकमचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मात्र यात नाना पाटेकर आणि अनिल कपूर ही जोडी नसणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये यााविषयी नाना पाटेकर यांनी खुलासा केला. त्यांना या वेळेस या चित्रपटासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. या वेळेस ते म्हणाले की, ‘‘२०१५ मध्ये ‘वेलकम बॅक’ यशस्वी झाला नव्हता आणि त्यामुळेच मी आणि अनिल कपूर आम्ही दोघांनी अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम ३’ नाकारला.

आमच्याकडे संपर्क करण्यात आला; पण आम्ही नकार दिला. ‘वेलकम ३’मध्ये कथा नाही. स्टोरी वाचून इतकी मजा आली नाही.’’ दरम्यान ‘वेलकम ३’ अर्थात ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास हा चित्रपट २७ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?

IND vs AUS: विराटवर शरीरवेधी मारा करा... कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकिपर नक्की काय म्हणाला?

मतदानासाठी शेवटचे १५ मिनिटे शिल्लक! सोलापूर जिल्ह्यात ५७.०९ टक्के मतदान; दक्षिण सोलापूर, शहर मध्य व शहर उत्तर या ३ मतदारसंघात सर्वात कमी मतदान

Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान वादात ICC चं मरण, कायदेशीर कारवाईची टांगती तलवार; जाणून घ्या नेमकं कारण

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

SCROLL FOR NEXT