navara maza navsacha  sakal
Premier

सचिन नाही तर 'हा' अभिनेता साकारणार होता 'नवरा माझा नवसाचा'मध्ये मुख्य भूमिका; सुप्रियाही दिसणार होत्या भलत्याच भूमिकेत

Payal Naik

२००५ साली प्रदर्शित झालेल्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील कलाकार, गाणी आणि संवाद सगळंच खूप गाजलं. या चित्रपटात कलाकारांची फौज होती. अभिनेते सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, रिमा लागू, सोनू निगम, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत अशा अनेक कलाकारांनी भन्नाट भूमिका साकारल्या होत्या. यातील संवाद आणि रॅपही खूप गाजलं. आता 'नवरा माझा नवसाचा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का की ' नवरा माझा नवसाचा' मध्ये सचिन हे मुख्य भूमिकेत दिसणार नव्हते.

हो, सचिन यांनी या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्याची निवड केली होती. एके दिवशी सचिन यांच्या मनात विचार आला की एखाद्या माणसाला जर त्याचा लहानपणीचा नवस मोठेपणी फेडावा लागला तर? तोही नग्न? या संकल्पनेवर सचिन यांनी चित्रपट काढायचा ठरवलं. त्यांनी ही गोष्ट घरच्यांना सांगितली आणि त्यांनाही ती आवडली. या चित्रपटासाठी सुरुवातीला अभिनेता भरत जाधव याची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. तर सुप्रिया या रिमा लागू यांचं राजकारणी व्यक्तीचं पात्र साकारणार होत्या. आणि सचिन स्वतः गायक सोनू निगम याच्या जागी एंट्री घेणार होते.

मात्र एका व्यक्तीने सचिन यांना फोन केला आणि त्यांनी व सुप्रिया यांनी मुख्य भूमिका साकाराव्या असा सल्ला दिला. सचिन यांनीही हा सल्ला ऐकला. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेदेखील दिसणार होते मात्र या चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीला ते आजारी पडले आणि अर्ध्यातच त्यांचं निधन झालं. या चित्रपटातील एकमेव न बदललेली गोष्ट म्हणजे व्हर्जिनल कंडक्टर लालू म्हणजेच अभिनेते अशोक सराफ. अशोक मामांचं पात्र आधीपासूनच ठरलेलं होतं. त्यात कोणताही बदल झाला नाही. आणि ते एक अर्थी चांगलंच झालं असं म्हणावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

SCROLL FOR NEXT