Panchayat 3
Panchayat 3 Esakal
Premier

Panchayat 3 : ४५ - ४७ अंश डिग्री तापमानात केलं पंचायत ३चं शूट ; नीना गुप्ता म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

Panchayat 3 : अॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) नुकतीच रिलीज झालेल्या पंचायत ३ ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंचायतचा (Panchayat 3 ) तिसरा सीजन रिलीज झाल्यापासून सगळीकडेच या वेब सिरीजची चर्चा आहे.

या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) फुलेरा गावच्या प्रधान मंजू देवी दुबेची भूमिका साकारत आहेत. नुकतंच एका दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी त्यांचा या वेबसिरीजच्या शूटिंग दरम्यानचा अनुभव शेअर केला.

भरउन्हात केलं शूटिंग

नुकतीच नीना यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं कि,"मला रोज शूटिंग सोडून घरी जायची इच्छा होत होती. आम्हला रोज ४५ ते ४७ डिग्री सेल्सिअस तापमानात शूटिंग करावं लागत होतं. यावेळी मी बाईकवरून खाली पडले. एकत्र रस्त्यात बरेच खड्डे होते आणि त्यात खूप ऊनही होतं. यावेळी आम्हां कलाकार आणि टेक्निशियनसाठी शूटिंग खुप आव्हानात्मक होतं. कलाकार मोकळ्या वेळात काही वेळतरी सावलीत किंवा पंख्याखाली उभे राहू शकायचे. पण हे शारीरिक दृष्ट्या खूप दमवणारं होतं. त्यामुळेच लोकांना ही वेबसिरीज आवडते कारण ती खूप खरी आहे, लोक तिच्याशी स्वतःला जोडू शकतात. मेहनत तर प्रत्येकाने केली पाहिजे. पण खरंच खूप मज्जा आली. "

प्रेक्षकांच्या प्रतिसादाने नीना भारावल्या

या वेबसीरिजला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाने नीना भारावल्या. त्या म्हणाल्या कि, "जेव्हा मला कळलं कि फक्त गावातीलच नाही तर शहरातील लोक सुद्धा पंचायत आवडीने बघतात तेव्हा मला धक्का बसला. हा प्रतिसाद पहिल्या सीजनपासून मिळतोय यावर माझा विश्वास बसत नव्हता. लोक मला भेटतात तेव्हा कायम त्यांना हा शो किती आवडतो त्याविषयी आवर्जून सांगतात. मी मध्यंतरी सिडनीमध्ये शूटिंग करत होते त्यावेळी एक बाई मला भेटायला आणि म्हणाली कि आम्ही गावातील खरं आयुष्य दाखवतो आणि तिची गावात राहणारी काकू एकदम माझ्या पात्रासारखी दिसते. ते या भूमिकांना त्या बरोबरच आम्हा कलाकारांना त्यांच्या खऱ्या आयुष्याशी इतकं जोडतात हे पाहणं मी एन्जॉय करते."

'ही' आहे कास्ट

पंचायत ३ मध्ये नीना यांच्यासोबत जितेंद्र कुमार, फैजल मलिक, रघुबीर यादव आणि चंदन रॉय यांची मुख्य भूमिका आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs RSA T20 WC Final : टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात फायलनमध्ये यापूर्वी जे झालं नाही ते भारतानं करून दाखवलं

Ind vs Sa T20 WC Final Live Score : हार्दिकने उंचावल्या भारतीयांच्या आशा, अर्धशतक करणारा हेन्रिक क्लासेन आऊट

Zika Virus : झिकाचा धोका! आणखी सहा जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले; 'अशी' घ्या काळजी

T20 World Cup 2024: टीका झाली, पण भिडू घाबरला नाय! फायनलमध्ये दुबेने दाखवली बॅटची ताकद

Virat Kohli : टी 20 वर्ल्डकपच्या फायनलचा किंग! विराटच्या संथ अर्धशतकानं पकडला वेग, रोहितचा विश्वास ठरवला सार्थ

SCROLL FOR NEXT