Heeramandi : सध्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित हिरामंडी ही वेबसिरीज खूप गाजतेय. तवायफांच्या आयुष्यावर आधारित असलेला या वेबसिरीजने कमी कालावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता या वेब सिरीजचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
भन्साळी प्रॉडक्शनच्या ऑफिशियल पेजवर व्हिडीओ शेअर करत सीजन २ ची घोषणा करण्यात आली. हटके पद्धतीने सीजन २ चो घोषणा वेबी सिरीजच्या टीमने केली. मुंबईतील मरीन ड्राइव्हवर सिनेमातील डान्सर्स क्रूने एकत्र येत या सीरिजमधील सगळ्या गाण्यांवर फ्लॅश मॉब सादर केला आणि सीजन २ लवकरच येत असल्याची घोषणा करण्यात आली. हा फ्लॅश मॉब पाहण्यासाठी खूप गर्दी जमली होती. कोरियोग्राफर कृती महेशने हा डान्स कोरियोग्राफ केला होता.
सोशल मीडियावर या फ्लॅश मॉबचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला 'मेहेंदी फिरसे जमेगी, हिरामंडी सीजन २ आयेगा' असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजत असून अनेकांनी सीजन २ साठी उत्सुकता कमेंट्समधून दर्शवली. अनेकांनी वेबसीरिज मध्ये पूर्वीचीच कास्ट ठेवण्याची मागणी केली असली तरीही बऱ्याच जणांनी आलम झेबच्या भूमिकेसाठी दुसऱ्या कोणत्यातरी अभिनेत्रीची निवड करण्याची मागणी कमेंट्समध्ये केली आहे.
हिरामंडीच्या पहिल्या सीजनमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळ पाहायला मिळाला. हिरामंडीची प्रमुख असलेली मल्लिकाजान आणि तिची भाची फरिदन यांच्यात सत्तेसाठी सुरु असलेला संघर्ष, बिब्बोजान या मल्लिकाजानच्या मुलीचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, मल्लिकाची धाकटी मुलगी आलम जिला शायरा बनायचंय आणि तवायफ न बनण्यासाठी तिचे सुरु असलेले प्रयत्न, तिच्या आयुष्यात आलेला ताजदार आणि याच दरम्यान इंग्रजांसोबत स्वातंत्र्यसाठी सुरु असलेला लढा आणि त्यातील तवायफांचं योगदान याची गोष्ट या सिरीजमध्ये पाहायला मिळाली. , , , ,
दरम्यान, हिरामंडीचा दुसरा सीजन कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे अजून जाहीर करण्यात आलं नाहीये. त्यासोबतच नवीन सीजनमध्ये कोण कलाकार असणार हे जाणून घेण्यास प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.