Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 खूप चर्चेत आहे. टीआरपीच्या रेसमध्येही बिग बॉस मराठी आघाडीवर आहे.नुकतंच बिग बॉस मराठीमध्ये तिसऱ्या आठवड्याचं नॉमिनेशन पार पडलं. तिसऱ्या आठवड्यात नॉमिनेट झालेलं सदस्य बघून सगळ्यांनाच धक्का बसला.
काल पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य नॉमीनेट झाले. टीम बी मधील एकही सदस्य यावेळी नॉमीनेट न झाल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. प्रेक्षकही बिग बॉसच्या या खेळीमुळे चकित झाले आहेत. जाणून घेऊया नॉमिनेशन नंतर पहिल्याच दिवशी वोटिंग ट्रेंडमध्ये कोण आहे आघाडीवर आणि कोण आहे पिछाडीवर जाणून घेऊया.
बिग बॉस मराठी इरा या इन्स्टाग्राम पेजने शेअर केलेल्या व्होटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाण पुन्हा एकदा आघाडीवर आहे. सुरजला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. तर अभिजीत सावंत सुद्धा दुसऱ्या स्थानावर आहे. तर योगिता चव्हाण आणि निखिल दामले पिछाडीवर आहेत. योगिता तिसऱ्या स्थानावर असून निखिल शेवटच्या स्थानावर आहे. गेल्या आठवड्यातही निखिलला सगळ्यात कमी वोट्स होते त्यामुळे निखिल घरातून बाहेर जाण्याची शक्यता वाढली आहे.
याबरोबरच योगिताही घरातून बाहेर जाणार असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. योगिताने गेल्या आठवड्यात तिला या घरातून बाहेर पडायचं आहे असं बिग बॉसला सांगितलं होतं. रितेश देशमुख आणि बिग बॉसने समजावून सुद्धा योगिता तिच्या म्हणण्यावर ठाम आहे. घरातील राजकारण आणि भांडण यांचा मानसिक त्रास योगिताला होतोय. त्यामुळे ती बाहेर पडत असल्याचं म्हणतेय. त्यामुळे योगिताही या आठवड्यात घरातून बाहेर जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
यावेळी नॉमिनेशनवेळी टीम ए ने खेळी खेळत टीम बीला नॉमिनेशन मध्ये आणलं आहे. त्यामुळे घरातून बाहेर कोण पडणार याविषयी सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे. यावेळी घरातून बाहेर कोण पडणार हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररो रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.