Bigg Boss marathi Season 5 Esakal
Premier

Bigg Boss Marathi Season 5: राखीशी तुलना ते बाहेर हाकलण्याची मागणी, ग्रुप A बाबत अशा आहेत नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi Season 5 Social Media Reactions: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये पहिल्या आठवड्यातच घरात दोन ग्रुप झालेले पाहायला मिळाले. घरातील निक्की तांबोळीच्या ग्रुपबाबत सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ खूप गाजतोय. घरात स्पर्धकांची सतत एकमेकांवर सुरु असणारी कुरघोडी, दोन ग्रुप्समधील भांडण , बुद्धीचा कस लागणारे टास्क यामुळे बिग बॉस मराठी खूप चर्चेत आहे. प्रेक्षक हा सीजन खूप चवीने बघत असून घरातील दोन्ही ग्रुप्सबाबत प्रेक्षकांमध्येही दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच आठवड्यात दोन गट पडले. अरबाज पटेल, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर, घनश्याम दरवडे म्हणजेच छोटा पुढारी आणि निक्की तांबोळी हा एक ग्रुप. यानंतर या ग्रुपमध्ये एरिनासुद्धा सामील झाली. तर दुसऱ्या गटात आहेत पंढरीनाथ कांबळी, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अभिजीत सावंत, निखिल दामले, आर्या जाधव, धनंजय पोवार, अंकिता प्रभू वालावलकर, सूरज चव्हाण हे स्पर्धक. यातील अभिजित आणि निखिल यांचे निक्कीच्या गृपशीही चांगले संबंध आहेत पण हे ग्रुप बी कडून खेळतात.

ग्रुप A ची दादागिरी पहिल्या दिवसापासूनच घरात पाहायला मिळाली. मग ते घरकाम करण्यावरून असो किंवा टास्कमधील आदळआपट. प्रत्येक वेळी दुसऱ्या टीममधील सदस्यांवर चढाओढ करणं आणि क्षुल्लक कारणावरून घरातील सदस्यांचा वैयक्तिक अपमान करणं यामुळे ग्रुप A बद्दल नाराजी आहे पण काहींना हा ग्रुप आवडतो सुद्धा आहे. सोशल मीडियावर या दोन्ही ग्रुप्सबद्दल काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया.

इंस्टाग्राम आणि फेसबुकवर नेटिझन्स पोस्ट आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांचं दोन्ही ग्रुपबद्दलच मत व्यक्त केलं आहे. जान्हवी, अरबाज, निक्की आणि वैभव यांच्या चाहत्यांनी त्यांना भरभरून सपोर्ट केला आहे. त्यांचा खेळ त्यांच्या चाहत्यांना आवडतो आहे. अनेकांनी त्यांच्यामुळेच बिग बॉस मराठी सीजन ५ चालत असल्याचा दावा केला आहे. बिग बॉस मराठीमध्ये निक्की आणि जान्हवीनेच इंटरेस्ट आणल्याचं अनेक नेटिझन्सनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हंटल आहे.

पण या सपोर्टच्या तुलनेत रोषाचा जास्त सामना या ग्रुपला करावा लागतोय. निक्कीची तुलना बऱ्याच प्रेक्षकांनी थेट राखी सावंतशी केली. काहींनी तिला तर थेट राखीच सावत्र बहीण असं कमेंटमध्ये म्हंटल आहे. तर जान्हवीचा वागणंही अनेकांना आवडलं नसून तिला खूप गर्व असल्याचं अनेकांनी कमेंट्समध्ये म्हंटल आहे. अनेकांनी तिला निक्कीची बुगुबुगु असं नावही ठेवलं आहे. तर घनश्यामही निक्कीचा नोकर असल्यासारखा वागत असल्यासारखं तो पुढारीपेक्षा कार्यकर्त्यासारखा वागतोय असं अनेकांचं म्हणणं आहे.

अरबाज आणि वैभवच्या खेळीवरही अनेकजण नाराज आहे. अरबाज फक्त त्याच्या शक्तीचा गर्व करतो तर वैभव अजिबात डोक्याचा वापर करत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या संपूर्ण ग्रुपला लवकरात लवकर बिग बॉस मराठीच्या घरातून काढून टाकण्याची मागणी अनेक प्रेक्षकांनी केली आहे.

प्रेक्षकांच्या या प्रतिक्रिया ग्रुप A पर्यंत पोहोचणार का ? ग्रुप A तुटणार कि असाच एकत्र राहणार ? बिग बॉस मराठीच्या आगामी एपिसोडमध्ये समजेल तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT