Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या झी मराठीवरील शोमुळे घराघरात पोहोचलेल्या डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी हा शो बंद होताच नव्या कार्यक्रमाची घोषणा केली. निलेश, भाऊ कदम आणि ओंकार भोजने आता 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या शोविषयी सगळेजण उत्सुक असतानाच निलेश यांच्यावर बनवलेलं एक मिमी सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि यावर कमेंट करत निलेश यांची बायको गौरी यांनी नाराजी व्यक्त केली केली.
नटरंगमधील किशोर कदम यांच्यावर चित्रित झालेल्या सीनवर निलेश यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला असून त्यावर 'चांगला कॉमेडियन होतास तू मीच तुला साडी नेसायला लावली' असं लिहीत त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मिम वर निलेश यांची पत्नी डॉ. गौरी साबळे यांनी कमेंट करत नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले.
काय म्हणाल्या गौरी?
"साडी नेसली... ती पात्राची गरज म्हणून नेसली आहे...तू जर कलाकार असतास तर तुला कळलं असतं पण सगळ्यांना परमेश्वर ती कला देत नाही...विनोद पाहून हसायचं असतं आणि आनंद घ्यायचा असतो..त्याची चिरफाड करून दुसऱ्याला त्रास देणं हा विकृत आनंद आहे." यावर पुढे बोलताना गौरी यांनी आणखी एक कमेंट केली. "दादा तू सुद्धा प्रसिद्धीसाठी त्याच्याच पोस्ट तयार करून टाकतोयस यातच त्याचं यश आहे...दुसऱ्याला नावं ठेवणारा कधीही मोठा होत नाही."
गौरी यांनी काही काळाने या कमेंट्स डिलीट केल्या. पण हा मिम बनवणाऱ्या डिजिटल क्रिएटरने पोस्टमध्ये या कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स टाकत पुन्हा एकदा गौरी यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला.
"निलेश साबळे यांच्यावर केलेल्या एका साध्या मीम वरून त्यांच्या बायकोला राग यावा हे थोरंच आहे.आयरनीच्या देवा तुला🙏🏼(कमेंट डिलीट केल्यात त्यांनी म्हणून स्क्रीनशॉट टाकलेत)" असं त्या युजरने पोस्टमध्ये म्हटलंय.
दरम्यान अनेकांनी या मिमवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण याबाबत निलेश यांनी अजून कोणतंही वक्तव्य केलं नाहीये.
निलेश यांचा नवा कार्यक्रम 'हसताय ना हसायलाच पाहिजे' 27 एप्रिलपासून कलर्स मराठी वाहिनीवर शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.