Kangana Ranaut  Esakal
Premier

Kangana Ranaut : कधी मुंबईची तुलना पाकिस्तानासोबत तर कधी पत्रकाराशी थेट 'पंगा'; कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगनाची 'ही' वादग्रस्त वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या कंगनाचं थप्पड प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. पण वादग्रस्त विधान करण्याची ही काही कंगनाची पहिलीच वेळ नाहीये. या आधीही कंगनाने अशी बरीच विधान केली आहेत ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं.

शेतकऱ्यांवर केलेली टीका

जेव्हा पंजाबमध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं जोरात सुरु होती त्यावेळी कंगनाने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिने शेतकऱ्यांचा उल्लेख 'दहशतवादी' असा केला होता. सोशल मीडियावर एका आंदोलनकांमधील एका शीख वृद्ध स्त्रीचा फोटो व्हायरल झाला होता. या आंदोलनावर टीका करताना कंगनाने ट्विटमध्ये खोटी माहिती दिली होती कि, ही महिला फक्त १०० रुपये मिळवण्यासाठी यांच्यामध्ये सामील आहे आणि हीच महिला बिल्किस बानो केसवेळी शाहीन बाग दादी म्हणून उभी राहिली होती.

पुढे कंगनाची हा दावा फोल ठरला आणि तिच्यावर जोरदार टीका झाली. तर दलजित दोसांजनेही तिला यावर खडेबोल सुनावले. त्यावर कंगनाने दलजित दोसांजला 'करण जोहरचा पालतू (पेट)' म्हणत टीका केली त्यावर दलजितने तिला "म्हणजे आपण एखाद्याच्या सिनेमात काम केलं म्हणजे आपण त्याचे पाळीव प्राणी झालो असा हिशोब असेल तर आजवर तू सिनेमात काम केलं आहेस म्हणजे तुझ्या मालकांची यादीही मोठी असेल." असं म्हणत तिची कानउघाडणी केली होती.

समीक्षकांशी घातला वाद

जस्टिन राव नावाच्या पत्रकाराने मणिकर्णिकाविषयी नकारात्मक टिप्पणी लिहिली होती. यावर चिडलेल्या कंगनाने तिच्या जजमेंटल है क्या ? या सिनेमाच्या सॉन्ग लाँन्चवेळी त्या पत्रकारांवर उघड टीका केली. ती म्हणाली,"तुम्ही माझ्याविषयी किती वाईट गोष्टी लिहिता. कट्टर असल्याची टीका करता पण एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी तुम्ही कुठून शोधून लिहिता. तुम्ही माझ्या मणिकर्णिका सिनेमावर टीका केली. मी सिनेमा बनवून चूक केली का ? मी राष्ट्रवादावर फिल्म बनवली म्हणून तुम्ही मला अराजकतावादी म्हणून टीका करता. " असं म्हंटलं होतं. भर कार्यक्रमातील कंगनाच्या या वक्तव्यानंतर सिनेमाच्या प्रॉडक्शन टीमने उपस्थित लोकांची एका पोस्टमधून माफी मागितली होती.

मुंबईला म्हंटलं पाकव्याप्त काश्मीर

जेव्हा कंगनाने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती तेव्हा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कंगनाची कानउघाडणी केली होती. यावर कंगनाने ट्विट केलं कि ,"शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी डोई आहे आहे आणि मला मुंबईमध्ये येण्यास मनाई केलीये. मुंबईच्या रस्त्यावरील आझादीच्या ग्राफिटी आणि आता मिळणारे या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे वाटू लागलीये."

यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत कंगनाच्या मानसिक आरोग्याची चौकशी केली होती आणि कंगना ज्या ताटात जेवते त्यातच थुंकते असं म्हणत टीका केली होती. याशिवाय तिला पाकव्याप्त काश्मीरला भेट देण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.

वरुण गांधींशीही केलं भांडण

राहुल गांधींचे चुलत भाऊ आणि बीजेपीमधील वरिष्ठ नेते वरुण गांधी यांच्याशीही कंगनाचा वाद झाला होता. कंगनाने एका मुलाखतीमध्ये १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य 'भीक' म्हणून मिळालं होतं २०१४ मध्ये खरं स्वातंत्र्य मिळालं असं म्हंटलं. यावरून कंगनावर सगळीकडून टीका झाली.

वरूण गांधी यांनी ट्विट केलं कि,"कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान, कधी त्यांच्या [महात्मा गांधींच्या] मारेकऱ्याचा आदर, तर आता लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान - शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखरपर्यंत. आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इतरांना मी वेडेपणा म्हणावे की देशद्रोह ?" असा प्रश्न केला. यावर कंगनाने ट्विट करत मी माझ्या बोलण्यातून तिने क्रांतिकारकांचा अपमान केला आहे हे सिद्ध केलं तर ती तिला मिळालेला पदमश्री पुरस्कार परत करेल असं म्हंटलं.

ममता बॅनर्जींवर टीका

काही वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगनाने बंगालमध्ये हजारो लोकांची हत्या झाल्याचं म्हंटलं होत आणि ममता बॅनर्जींवर टीका केली होती. यानंतर कंगनावर ट्विटरने कारवाई करत तिचं ट्विटर अकाऊंट कायमच बंद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT